आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stone Pelt On Congress Propoganda Vehicle, Divya Marathi

काँग्रेसच्या प्रचार गाड्यांवर मलकापूरमध्ये दगडफेक, चौघांवर गुन्हे दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारफेरीतील गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी वाकोडी येथे कॉँग्रेसच्या प्रचारसभेतील सहा गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे उमेदवार अरविंद कोलते हे हरीश रावळ, साहेबराव मोरे, सोपान शेलकर व काँगेस तालुकाध्यक्ष रमेश खाचणे यांच्यासह पुरुष व महिला पदाधिका-यांसह प्रचारासाठी वाकोडी या गावी गेले होते. प्रचारफेरी सुरू असतानाच वाहनांमध्ये फक्त चालक होते. या वेळी चार ते पाच युवकांनी लाठ्या-काठ्या घेऊन गाड्यांवर हल्ला चढवला. याप्रकरणी सुधीर पाचपांडे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली होती. या घटनेत कालुसिंह राजपूत, अरविंद तायडे, हेम निकम व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले अ‍ाहे.