आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात कावड यात्रेवर दगडफेक; 5 पोलिसांसह 13 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी निघालेल्या कावड यात्रेच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने सोमवारी पातुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दगडफेकीत पाच पोलिसांसह 13 जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींपैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अरविंद देवलाल सुरवाडे व नहीमउद्दीन सलिमोद्दीन (22) यांच्या डोक्याला धारदार शस्त्रांचा मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दंगेखोरांनी गुरुवार पेठ, गुजरी लाइन, बाळापूर रोड परिसरात काही दुकाने, दुचाकी, चार चाकी वाहनांची तोडफोड केली.


शनिवारी बाभूळगाव येथील एक महिला पातूरला येत असताना दोघांनी छेड काढली होती. त्या महिलेने काही जणांना या घटनेची माहिती सांगितल्यावर जमावाने त्या दोघांना चोप दिला होता. या घटनेने पडसाद आजच्या दंगलीच्या रूपात उसळल्याची चर्चा होती.