आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा पथकावर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महान ते अकोला या मार्गादरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील फेब्रुवारीला केलेल्या चौथ्या अवैध नळजोडण्या तोड मोहिमेत संतप्त गावक-यांनी महापालिकेच्या पथकावर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत सात कर्मचारी जखमी झाले, तर जेसीबी मशीनच्या काचाही फोडल्या. परंतु, या दगडफेकीला प्रत्युत्तर देत महापालिकेच्या प्रशासनाने एकूण दहा अवैध नळजोडण्या उद्ध्वस्त करत शेकडो मीटर पाइप जप्त केले.

शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. काटेपूर्णा प्रकल्पातून उचल केलेल्या पाण्यावर महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. १९७७ साली ६०० मिलिमीटर व्यासाची महान ते अकोला अशी मुख्य जलवाहिनी अंथरण्यात आली. सीआय पद्धतीची ही जलवाहिनी जुनी असून, बार्शिटाकळी शहरातील जुन्या मार्गावरून ती गेली आहे. बार्शिटाकळी ग्रामपंचायतीलाही याच जलवाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा भरणा केल्याने महापालिकेने पाणीपुरवठा बंद केला आहे. एकीकडे महापालिकेने पाणीपुरवठा बंद केला असला, तरी गावातील नागरिकांनी मुख्य जलवाहिनीवर थेट जोडण्या घेतल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही शुल्काचा भरणा करता २४ तास अवैध नळजोडण्याच्या माध्यमातून सर्रासपणे पाणी घेतले जात होते. हा प्रकार आतापर्यंत आलेल्या सर्वच वरिष्ठ अधिका-यांना माहिती होता. परंतु, कारवाई कोणीही केली नाही. परंतु, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रथम रीतसर पोलिस तक्रार दाखल केली. त्यानंतर १७ जानेवारीला मुख्य जलवाहिनीवरील बार्शिटाकळी येथे अवैध नळजोडण्यांवर कारवाई केली. या वेळी गावक-यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपायुक्तांसह महापालिकेच्या अधिका-यांनी हा विरोध हाणून पाडला. यानंतर पुन्हा दोन वेळा अवैध नळजोडणी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर सहायक आयुक्त तथा उपायुक्त माधुरी मडावी यांनी दोन दिवसांपूर्वी दोन अवैध नळजोडण्यांवर कारवाई केली होती. दरम्यान, जानेवारी महिन्यात अवैध नळजोडण्या तोडल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरून अवैध नळजोडण्या घेतल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपायुक्त माधुरी मडावी यांनी फेब्रुवारीला पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेत एकूण दोन इंची आकाराच्या दहा नळजोडण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच जमिनीत अंथरलेल्या शेकडो मीटर लांबीच्या जलवाहिन्या जप्त करण्यात आल्या. या मोहिमेत उपायुक्त माधुरी मडावी, शहर अभियंता अजय गुजर, विष्णू डोंगरे, शेख फिरोज, सतीश ढगे आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

मीटरलावा पाणी घ्या
कारवाईदरम्यानग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांनी उपायुक्त माधुरी मडावी यांना पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. गावाला दुसरा कोणताही पर्याय नसल्याने गावकरी अवैध नळजोडणीच्या माध्यमातून पाणी घेतात. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू करा, अशी मागणी सदस्यांनी केल्यानंतर मीटर लावा. दोन लाख रुपयांची बँक गॅरंटी द्या, त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करू, असे आश्वासन उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिले.
दगडफेकीनंतर धरा..धरा...पळा.. पळा... असे वातावरण झाले होते.
ग्रामपंचायतीतर्फे तक्रार : झालेल्यादगडफेक प्रकरणात महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या तोडफोडीची तक्रार ग्रा. पं. ने पोलिसात दिली आहे.

सात कर्मचारी किरकोळ जखमी : संतप्तगावक-यांच्या जमावाने अवैध नळजोडणी तोडणा-या पथकावर दगडफेक केली. या दगडफेकीत नरेश बावणे, संदीप चिमणकर, पंकज जयस्वाल, बाबाराव शिरसाट, प्रवीण मिश्रा, ठेकेदार शेख फिरोज, सतीश ढगे जखमी झाले.
तीन कोटी थकित : बार्शिटाकळीलामनपाकडून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, ग्र. प. कडे दोन कोटी ८५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकली. या पाणीपट्टीचा भरली नसल्याने पाणीपुरवठा बंद केला होता.
ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड : संतप्तजमावाने महापालिकेच्या पथकावर दगडफेक केल्यानंतर आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळवला. जमावाने ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्च्या, टेबल, पंखे आदींची तोडफोड जेसीबीच्या काचा फोडल्या.

पूर्वानुभव लक्षात घेऊन निर्णय
पूर्वानुभवलक्षात घेऊन अकोला महापालिकेने अवैध नळांचे कनेक्शन ताेडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने मीटर घ्यावे तसेच दोन लाख रुपयांची बँक गॅरंटी द्यावी त्यानंतरच ग्रामपंचायतीला पूर्ववत पाणीपुरवठा केला जाईल.' अजयगुजर, शहरअभियंता महापालिका