आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानडुकराचा हल्ला; शेरूने वाचवले मालकिणीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- कुत्र्या प्राण्याच्या इमानदारी आणि स्वामीनिष्ठेच्या अनेक कथा इतिहासात आहेत. कुत्र्याची स्वामीनिष्ठा अधोरेखित करणारी अशीच एक घटना अकोट शहरात उघडकीस आली आहे. रानडुकराच्या हल्ल्यातून पाळीव कुत्र्याने मालकिणीचा जीव वाचवल्याचा प्रकार येथे घडला आहे.
येथील शनिवारपुरा भागातील नंदाबाई अर्जुनसिंह ठाकूर ही महिला बकऱ्या चारून स्वत:ची उपजीविका भागवते. जून रोजी दुपारी वाजता नंदाबाई बकऱ्या चारण्यासाठी येथील शिवाजी कॉलेजमागील खोकला भवानी परिसरात गेली होती. खाई नदीतून बकऱ्या बाहेर काढून ती घरी येत असताना अचानकपणे बाजूच्या झुडपातून आलेल्या एका रानडुकराने नंदाबाईवर हल्ला चढवला. रानडुकराच्या धडकेने त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तसेच रानडुकराने नंदाबाईच्या पोटाजवळ चावा घेतला. दरम्यान, त्यांचा पाळीव कुत्रा शेरूने त्या डुकरावर प्रतिहल्ला चढवला. त्या रानडुकराने पळ काढला. जखमी अवस्थेत नंदाबाई शहरात दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
शेरूला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
मालकिणीचाजीव वाचवण्यासाठी रानडुकराशी झुंज देणाऱ्या स्वामीनिष्ठ शेरू कुत्र्याला पाहण्यासाठी नागरिकांनी नंदाबाईच्या घरी गर्दी केली होती. नंदाबाईसुद्धा शेरूच्या शौर्याची गाथा कृतज्ञतेने सांगत होती. यानिमित्ताने कुत्र्याच्या स्वामीनिष्ठेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
वन विभागाकडून मदतीची अपेक्षा
रानडुकराच्याहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नंदाबाईला वन विभागाकडून मदतीची अपेक्षा आहे. घरची हलाखीची स्थिती असून, दररोज कामावर गेल्याशिवाय चूल पेटत नाही. त्यामुळे वन विभागाने नियमाप्रमाणे मदत देण्याची मागणी होत आहे.