आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचा प्रताप; कुर्‍हा येथील महिलेची रस्त्यातच झाली प्रसूती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिसोड - तालुक्यातील कुर्‍हा येथील शीला गोपीचंद राठोड या महिलेला बुधवारी रात्री नऊ वाजता रिसोड येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी नेत असताना शासकीय रुग्णवाहिकेच्या मद्यपी चालकाने तिला अर्धा रस्त्यातच भरजहागीरला उतरून दिले. परिणामी, शीला यांची रस्त्यावरच प्रसूती झाली. शीला यांना त्यांच्या नातेवाइकांनी मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.

मात्र, त्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने केंद्राच्या रुग्णवाहिकेने रिसोड येथे पाठवण्याचे ठरवले. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक दारूच्या नशेत होता. रुग्णवाहिका भरजहागीर येथे पोहोचल्यानंतर मद्यधुंद चालकाने तेथेच रुग्णवाहिका उभी केली आणि गर्भवती शीला आणि त्यांच्या नातलगांना खाली उतरवले. दरम्यान, शीला यांची रस्त्यावरच प्रसूती झाली. ही बाब भरजहागीर येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी तत्काळ नवजात शिशू आणि त्याच्या मातेला मदत पोहोचवली.