आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक व्याघ्र दिन: पथनाट्यातून चिमुकल्यांनी दिला वाघ वाचवण्याचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वाघ हा भोजन शृंखलेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. वाघाचे पर्यावरण संवर्धनातील स्थान महत्त्वाचे आहे. मात्र, जंगलावरील मानवाचा वाढता हस्तक्षेप व अतिक्रमण वाघांच्या अधिवासावरच हल्ला चढवत आहे. वाघ वाचला, तरच पर्यावरण वाचेल, त्यासाठी प्रत्येकाने वाघ वाचवण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असा संदेश नवावा स्वावलंबी विद्यालय व प. र्शी. राकृ. शुक्ल उमाविअंतर्गत स्वावलंबी इको क्लबच्या वतीने आज 29 जुलैला पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. जागतिक व्याघ्र दिन 29 जुलैचे औचित्य साधून अकोलेकरांमध्ये जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या पथनाट्यात सहभागी झालेल्या स्वावलंबी इको क्लबच्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांनी चेहर्‍यावर वाघोबासारखी रंगरंगोटी करत त्यांच्या समस्यांचा पाढा त्यांच्या मुखातून उपस्थितांसमोर मांडला. दोन चिमुकल्या मुलींनी वाघ व बिबट्याची वेशभूषा साकारून संवाद साधला. पर्यावरण र्‍हास, शिकार आदींसह विविध समस्या दूर करण्यासाठी त्यांनी माहिती दिली. त्यासोबतच शिकारीचे नेटवर्क चीनपर्यंत कसे फोफावले आहे, शिकार्‍यांचा आपसातील संवाद, वाघाला जागतिक बाजारात असलेले मूल्य आदींवर त्यांनी लक्ष वेधले.
शहरात ठिकठिकाणी झालेल्या या पथनाट्याला अकोलेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच टाळ्या वाजवून चिमुकल्यांचे कौतुक केले. या पथनाट्यात दिव्या काकडे, वैष्णवी इंगळे, गणेश चौरसिया, नीलेश रत्नपारखी, अजय आंबुसकर यांनी आपला अभिनय सादर केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुमंगला बुरघाटे, उपमुख्याध्यापिका रेखा पाटोळे, पर्यवेक्षिका सीमा पांडे उपस्थित होत्या.
सदर पथनाट्य यशस्वी करण्यासाठी इको क्लबचे समन्वयक हरीश शर्मा, कला शिक्षक सौरभ र्शीवास्तव, निशांत दलाल, स्काउट शिक्षक संतोष मारशेट्टीवार, राजेश्वर पेठकर, मनीष देशपांडे, राजन शर्मा, महेश पांडे, राम पोरे यांचेसह इको क्लबचे विद्यार्थी सौरभ मारोठे, रघू शर्मा, सूरज शर्मा, आंचल दीक्षित, अश्विनी पाचपोळ, शिवानी गवळी, भाग्यर्शी खत्री, सारिका दुबे, सलोनी पांडे आदींनी पुढाकार घेतला. चिमुकल्यांनी पर्यावरणाची जागृती केल्याच्या उपक्रमाचे कौतुक झाले.
इथे झाले पथनाट्य
‘वाघ वाचवा’चा संदेश देणारे पथनाट्य स्वावलंबी इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 ला महाराणा प्रताप बागेसमोर शहर कोतवाली चौकात सादर केले. त्यानंतर सिंधी कॅम्प परिसर व अनिकट परिसरातही पथनाट्य सादर करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी वाघासारखे चेहरे रंगवलेले विद्यार्थी व त्यांचा माइकवरील संवाद ऐकून येणारे-जाणारे थबकून हा काय प्रकार आहे, हे पाहत होते. तसेच त्यांची वाघ वाचवण्यासाठीची धडपड पाहून त्यांचे कौतुक करत होते.