आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stringency Water Purification Center At Motions For Air Circuit Breakers

टंचाई-जलशुद्धीकरण केंद्रात एअर सर्किट ब्रेकरसाठी हालचालींना वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-पुढील आठवड्यात पाण्याचा होणारा मेगाब्लॉक पाहता रविवारी झोन-4 मध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांनी नऊ ते दहा दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची गरज महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

कामाची तयारी पूर्णत्वाकडे : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील एअर सर्किट ब्रेकर बसवण्यासाठी आवश्यक सामग्री व तयारी पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पाणीपुरवठा 21 जानेवारीला ठप्प केल्यानंतर केंद्रात उपकरण बसवण्यासाठीची तयारी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तिथे वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ब्रेक डाउन करण्याची तयारी महावितरणने केली आहे.

पंपाचा वापर टाळा : पाणी साठवणूक करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांद्वारे नळावर विद्युत मोटर पंप लावत पाणी ओढण्याची स्पर्धा लागलेली असते. नागरिकांनी नळाला विद्युत मोटरपंप लावत पाणी ओढू नये, त्यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहचत नाही. अशा परिस्थितीत पाणी मिळत नसल्याची तक्रारी समोर येत आहे.

शहरातील झोन-4 मध्ये आज होणार पाणीपुरवठा

आदर्श कॉलनी जलकुंभ : आदर्श कॉलनी, हिराबाई प्लॉट, संभाजीनगर, व्हीएचबी कॉलनी, नगर परिषद कॉलनी, काँग्रेसनगरचा काही भाग.

महाजनी जलकुंभ : मुजफ्फरनगर, नाजूकनगर, मोहता मिल, फिरदौस कॉलनी, जंगममठ, खेतान जीन, जनता बँक, रिगल टॉकिज, सावताराम मिल, लकडगंज, गवळीपुरा, माळीपुरा, हनुमान बस्ती, विजयनगर, भवानीपेठ, समतानगर, उत्तमचंद प्लॉट, लेबर कॉलनीतील काही भाग, नवीन तारफैलमधील काही भाग, सिद्धार्थनगर, जुना तारफैल, टिळक रोड, गवळीपुरा, मंगलदास मार्केट.

केशवनगर जलकुंभ : परिवार कॉलनी, महालक्ष्मी नगर, वर्धमाननगर, नाईकनगर, रविनगर, प्रमोदनगर, समता कॉलनी, पावसाळे ले- आउट, गोमाजीनगर, खेताननगर, र्शद्धानगर, कौलखेड, नागे ले- आउट, कृष्णनगरी, झाबाजीनगर, लहरिया नगर, बंजारा कॉलनी, गायत्रीनगर, आरोग्यनगर, बलोदे ले-आउट, हिंगणारोड.

बसस्टँड जलकुंभ : आंबेडकरनगर, टॉवर रोड, न्यू र्शावगी रोड, र्शावगी प्लॉट, गंगाधर प्लॉट, भाजीबाजार, टॉवर रोड, रेल्वे क्वॉर्टर, भाटे क्लब, खदान, सिंधी कॅम्प, कच्ची खोली, पक्की खोली, जेतवननगर, हमालपुरा, कच्ची मज्जीद परिसर, सरकारी गोडावून परिसर, आदर्श कॉलनी, गायत्रीनगर, शास्त्रीनगर, पेन्शनपुरा.