आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस फेरी बंद झाल्यामुळे होताहेत विद्यार्थ्यांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकोला येथे शिक्षणासाठी यावे लागते. जिल्हय़ातील बर्‍याच गावांमधून विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळांमध्ये येण्यासाठी बस नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी वाडेगाव ते अकोला यादरम्यान बसफेरी सुरू करावी याबाबत खासदार संजय धोत्रे यांनी राज्य परिवहन विभाग नियंत्रकांना एका पत्राद्वारे कळवले आहे.

सकाळी 7.30 वाजता कुठलीही बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी या मार्गावर बस सुरू करून गोरेगावला बस थांबा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रकांकडे केली आहे. गोरेगाव ते वाडेगाव दरम्यानच्या गावांमधील विद्यार्थ्यांनी परिवहन विभागाकडे सकाळी बसफेरी सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. बस फेरी सुरू न झाल्यास गोरेगाव येथे रास्ता रोको आंदोलनही करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता वेळेवर बस नाहीत. काही बस वाडेगाव ते अकोला मार्गावरून धावतात. मात्र, गोरेगाव येथे त्या थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशा आशयाचे निवेदन दोन वेळा येथील आगार प्रमुखांना दिले आहे.

खासदारांचेही पत्र
गोरेगाव, माझोड, नकाशी, कळंबेश्वर, भरतपूर, खरप व वाडेगाव येथील विद्यार्थ्यांना दररोज अकोला येथे येण्याकरिता सकाळी कोणतीही बससेवा नाही. या विद्यार्थ्यांना सकाळी 7.30 वाजता अकोला ते वाडेगाव एसटी बससेवा सुरू करावी, असे पत्र खासदार संजय धोत्रे यांनीसुद्धा राज्य परिवहनच्या विभाग नियंत्रकांना दिले आहे.