आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Of Brand Ambassador Of Sanitation Campaign

विद्यार्थी बनणार स्वच्छता दूत; सहा दिवसांचे अभियान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, यासाठी राइट टू पी अभियान राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान, सहा विशेष दिवस साजरे केले जातील. यामध्ये स्वच्छता दूत बनलेले विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत.

१४ नोव्हेंबर बाल दिन ते १९ नोव्हेंबर जागतिक स्वच्छता दिन असे सहा दिवस हे अभियान राबवले जाईल.

कायआहे या अभियानात : बालकांनालघवी शाैचाला जाण्यासाठी शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रा स्थळे, उपाहारगृहे, प्रेक्षणीय स्थळे, बाजार, मैदाने या ठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे वेळेवर बालकांना स्वच्छतागृहे उपलब्ध होणे या बालकांच्या हक्काची म्हणजेच राइट टू पी या अधिकाराची जाणीव त्यांना करून दिली जाईल.

स्वच्छपरिसर : ज्याशाळेला मैदान आहे, अशा मैदानाची स्वच्छता श्रमदानातून करतील.
स्वच्छअन्न दिवस :शालेय मध्यान्हभोजन पूरक आहार शिजवण्यापूर्वी घ्यावयाच्या दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सामूहिक हात धुण्याचा कार्यक्रम राबवण्यात येईल.

पाच दिवस अभियान राबवण्याबाबत सर्व शाळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अभियानात इतरही शासकीय कर्मचारी सहभागी होत आहेत. अभियानाच्या माध्यमातून बालमनावर स्वच्छता प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे.'' एस.एम. कुळकर्णी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग.

असे होणार दिन साजरे
१४नोव्हेंबर - स्वच्छशाळा स्वच्छ अंगणवाडी दिवस
१५नोव्हे. - स्वच्छपरिसर दिन
१६नोव्हेंबर - वैयक्तिकस्वच्छता बाल आरोग्य दिन
१७नोव्हेंबर - स्वच्छअन्न दिवस
१८नोव्हंेबर - स्वच्छपिण्याचे पाणी दिन
१९नोव्हेेंबर - जागतिकशौचालय दिन
"राइट टू पी'
दृष्टिक्षेपात उपक्रम
राज्य शासनाचा पुढाकार, १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राबवणार उपक्रम; शाळांमध्ये हक्क, अिधकारांची विद्यार्थ्यांना देणार माहिती

स्वच्छ पिण्याचे पाणी : विद्यार्थ्यांनापिण्याचे पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या जातील. शुद्ध पाणी नेहमी प्यावे हा संदेश त्यांना देण्यात येईल.

स्वच्छ शाळा स्वच्छ अंगणवाडी दिवस , गाव स्तरावरील शासकीय कर्मचारी प्राथमिक, माध्यमिक अंगणवाडीच्या िवद्यार्थ्यांचा सहभाग घेत परिसर स्वच्छता करतील. त्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतील.

वैयक्तिक स्वच्छता बालआरोग्य : वैयक्तिक स्वच्छता ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर वस्तू देऊन गौरवण्यात येईल. तसेच स्वच्छतेचे सहा संदेश लेखी स्वरूपात देऊन घरोघरी दर्शनीय भागात ते लिहावे.

शौचालय दिन : विद्यार्थी,अंगणवाडीतील ते वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा गर्भवती माता यांना वैयक्तिक शौचालयाची संकल्पना पटवून दिली जाईल. शौचालयाचा वापर करणाऱ्या कुटुंबाना शौचालयाचे महत्त्व पटवून देणे यांसारखे उपक्रम राबवले जातील.