आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्तीपासून अनेक विद्यार्थिनी वंचित राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना देण्यात येणार्‍या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, अनेक शाळांचे तसेच विद्यार्थिनींचे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते नसल्यामुळे शाळांची अर्ज भरताना दमछाक होत असून, अनेक विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीपर्यंत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे अर्ज साध्या पद्धतीने भरून घेतले जात होते. मात्र, काही शिक्षणसंस्थांकडून विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचत नसल्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती देण्यासाठी या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने सर्वच शिष्यवृत्तींचा अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. मात्र, काही शाळांनी समाजकल्याण कार्यालयातून युजर आयडी आणि पासवर्ड 25 तारखेनंतर नेले. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरताना या अर्जामध्ये शाळांचे आणि विद्यार्थिनींचे खाते राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये असणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, अनेक शाळांचे आणि विद्यार्थिनींचे खाते हे को-ऑपरेटिव्ह बँकांचे असल्यामुळे या विद्यार्थ्यांना नव्याने खाते उघडावे लागत आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भात शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. मात्र, ते न दिल्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज भरताना शाळांना त्रास होत असल्याची माहिती आहे.