आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विजेचा वापर न करता चालवू शकता मिक्सर, ग्राईंडर आणि पाण्याचा पंप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विजेचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी मिक्सर, ग्राईंडर आणि पाण्याचा पंप चालवू शकता. मेहरबानो महाविद्यालयात आयोजित इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात बेलखेडच्या सावित्रीबाई कन्या विद्यालयातील ऋतुजा वानखडे या विद्यार्थिनीने ‘अशी वाचवा वीज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे.

दहावीत शिकणार्‍या ऋतुजाने यासाठी जुन्या सायकलचा वापर केला. प्रदर्शनात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमुळे अनेकांना प्रेरणा मिळालीच, शिवाय मान्यवरही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कसब पाहून थक्क झाले. जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे इन्स्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत पुरस्कारार्थी विद्यार्थ्यांच्या तिसर्‍या जिल्हा प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी मेहरबानो महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा इंगळे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी महापौर ज्योत्स्ना गवई होत्या. व्यासपीठावर शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, डॉ. गाडगे, उपशिक्षणाधिकारी विज्ञान मंडळाचे रवींद्र भास्कर आदी उपस्थित होते.

अकोल्याचे नाव उज्ज्वल करा
मागील वर्षी अकोल्याने राष्ट्रीयस्तरावर विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली होती. यावर्षीही विद्यार्थ्यांनी राज्य व देश पातळीवर अकोल्याचे नाव उज्ज्वल करावे, यशासाठी विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न करावेत, असे मत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी व्यक्त केले.

कल्पनांना वाव मिळेल

लहान वयातच मुलामुलींमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. त्यांच्या कल्पनांना व्यासपीठ देण्यासाठीच इन्स्पायर अवॉर्ड उपक्रम आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी केले. भविष्यात नोकरी, व्यवसाय, संशोधनात हमखास उपयोगी पडते, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी मांडले.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या कसे करता येतील घरच्या घरी प्रयोग.