आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमामध्ये आता योगाचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-वाढती स्पर्धा आणि अभ्यासाचा ताणतणाव दूर होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता योगा शिक्षणही दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढाकार घेतला असून, इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून योगाचे धडे दिले जाणार आहेत.

शालेयदशेत मुलांची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे त्यांना योगाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक प्रयोगाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे, ताणतणावापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणे तसेच मुलांचा बुद्धिगुणांक वाढवणे यासाठी योगाच्या अभ्यासक्रमामुळे मदत होणार आहे. विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची चढाओढ लक्षात घेऊन त्यामध्ये आपला पाल्य यशस्वी व्हावा, यासाठी पालकांचा प्रयत्न असतो. मुलांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने योगा हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संकेतस्थळावर त्या संबंधीची सूचनाही देण्यात आली आहे. योगा शिक्षकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे. योगाचा अभ्यासक्रमही संकेतस्थळावर देण्यात आला आहे. यामुळे अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थी व पालकांनाही माहिती घेता येणार आहे.

असा असेल वर्गनिहाय अभ्यासक्रम

सहावी- योगाचे प्राथमिक ज्ञान, व्यायाम, आसने
सातवी-योगाचे प्रकार, आसने, प्रार्थना
आठवी-मानववंशशास्त्र आणि शरीर रचनाशास्त्र
नववी-मानवी जीवन आणि योगाचा संबंध, अष्टांग योगाचे महत्त्व
दहावी- प्राणायाम आणि ध्यान
अकरावी-योगाची भूमिका, चक्र
बारावी- योगाचा परिणाम, प्राणायाम आणि मानवी शरीर