आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sub Divisional Officer Khadse Said, We Need To Increase Agricultural Productivity

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे- शेतीची उत्पादकता वाढवणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- पाण्याची पातळी तसेच जमिनीची उत्पादकता वाढवून जमीन सुपीक झाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतालगत सुरू असलेल्या सिमेंट नालाबांध नाला खोलीकरणाचे काम प्रत्यक्ष लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावे. ज्यामुळे पाणी अडवून पाणी जमिनीत जिरवण्यास मदत होईल, असे आवाहन अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत बोरगावमंजू येथील शेतालगत सुरू असलेल्या नाला खोलीकरण सिमेंट बांधाच्या ठिकाणी जून रोजी प्रत्यक्ष भेट देऊन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. सिमंेट नालाबांध आणि नाला खोलीकरण शेततळे याचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी युद्धपातळीवर सुरू अाहे, असेही प्रा. खडसे यांनी सांगितले. या वेळी जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता शेखर सवाई, शाखा अभियंता कळंबे, मंडळ अधिकारी सुनील देशमुख, तलाठी म्हैसने, पाटेकर, चोपडे उपस्थित होते.
अभियान यशस्वी करा : जलयुक्तशिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीची उत्पादकता वाढवून दुसऱ्या पिकासाठी ओलीत करण्यात मदत होईल. जमिनीत खोलवर ओलावा निर्माण होईल. एका पाण्याने आलेले पीक जाणार नाही. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या शेतालगत सुरू असलेले काम यशस्वी करून घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रा. खडसे यांनी केले.