आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्या पंखांनी घेतली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शारीरिकअपंगत्व असले तरी शिकण्याची धडपड प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मेहनतीने सर्व समस्यांवर मात करता येते... याचे उदाहरण म्हणजे, सृष्टी मनोज रवणे. जन्मत: कर्णबधिर असणारी सृष्टी वयाने दहा वर्षांची असली, तरी तीन वर्षांपासून ती ऐकायला, बोलायला शिकत आहे. एकवीरा मल्टिपर्पज फाउंडेशनद्वारा संचालित कर्णबधिर मुलांच्या शाळेत ती शिकत आहे.

जेमतेम दीड महिन्यांच्या अभ्यासावर सृष्टीने सर्वसामान्य मुलांसोबत महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा (एमटीएस) दिली. यात तिने ३०० पैकी १६० गुण मिळवून मेरिट येण्याचा बहुमान पटकावला. सर्वसामान्य मुलांसोबत त्यांच्या बरोबरीने ही स्पर्धा परीक्षा देण्याचे हे कर्णबधिर मुलांचे पहिले वर्ष. आपल्याला ऐकायला येत नाही म्हणजे, आपण काही अधू नाही. आपणदेखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेऊन प्रगती करू शकतो, जीवन जगू शकतो, याच जिद्दीने या चिमुकल्या पंखांनी घेतलेली ही "गगनभरारी झेप.'

मूळची वाशीम जिल्ह्यातील कोंडोली येथील सृष्टी बालपणापासून कर्णबधिर. त्यात हृदयाला छिद्र असल्याने फार जपावे लागले. हृदयाच्या शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणतेच उपचार करता येणार नाही, म्हणून सृष्टी पावणेचार वर्षांची असताना तिचे हृदयाचे ऑपरेशन झाले. वडील मनोज रवणे, प्राण्यांचे डॉक्टर, तर आई अर्चना ह्या गृहिणी. सृष्टी लहान असताना वडिलांना नोकरी नव्हती. त्यामुळे ऑपरेशनचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. हृदयाच्या ऑपरेशननंतर कानाच्या ऑपरेशनसाठी धडपड सुरू झाली. तिच्या कानाचे काहीच होऊ शकत नाही. उगाच तिच्यावर खर्च करू नका, असा सल्ला अनेक डॉक्टरांनी दिला. खचून गेल्यानंतर सन २००९ मध्ये एका नातेवाइकांच्या सांगण्यावरून रवणे दाम्पत्य श्रीकांत बनसोड सुचिता बनसोड यांच्या शाळेत आले. पण, सुचिताताई खूप शिस्तप्रिय आहेत आपली मुलगी हट्टी, तर येथे तिचा टिकाव लागणार नाही. त्यापेक्षा तिच्या कानाचे ऑपरेशन झाल्यानंतर तिला येथे पाठवू, असा विचार करून ते परत गेले. मात्र, मुंबईतील डॉक्टरांनी ऑपरेशन करता त्यांना अकोल्याला परत पाठवले. २०११ साली सृष्टीने या शाळेत प्रवेश घेतला. तिचे प्राथमिक प्रशिक्षण सुरू झाले. सुरुवातीला काही थेरपी झाल्यानंतर २०१२ मध्ये तिच्या कानाचे ऑपरेशन झाले, ऐकू येण्याचे मशीन बसवण्यात आले.

सोबतच्या सवंगड्यांनाही सवयींबाबत दिला प्रेरक संदेश
मागीलतीन वर्षांपासून सृष्टीची शब्द ओळख सुरू झाली. एक एक शब्द ऐकून, समजून घेऊन तो उच्चारण्याचा प्रयत्न करणारी सृष्टी आज भाषण देते, उत्तम गाणे म्हणते. नृत्याची आवड असणाऱ्या सृष्टीला इंग्रजी विषय सर्वात जास्त आवडतो. आज सृष्टी तिचा मोठा भाऊ तन्मयसोबत अभ्यास करते. अतिशय भावनिक असणाऱ्या सृष्टीला बाबांचा मोठा धाक आहे. आपण कधी चूक करू नये याची ती सतत काळजी घेत असते, अशी ही चिमुकली स्वत: शिकत असताना सोबतच्या सवंगड्यांनाही चांगल्या सवयी शिकवते.