आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद सोमवार: वाशिंब्याच्या अल्पभूधारक शेतकऱ्याची दुग्ध भरारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- नैसर्गिक संकटांमुळे नापिकी आणि आर्थिक स्थिती खालावल्यानंतरही हताश होता या संकटांवर मात करण्यासाठी दूध विक्रीचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वाशिंबा येथील दिलीप देवीदास गव्हाणे या अल्पभूधारक शेतकऱ्याने सुरू केला आहे.
बिकट स्थितीमुळे दहावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्या दिलीप गव्हाणे यांनी १९९४मध्ये पानपट्टी सुरू केली. जिद्द चिकाटी तसेच मिळेल ते काम करण्याची बालपणापासून सवय असल्याने त्यांचा हा व्यवसाय चांगलाच वाढत गेला. त्यानंतर त्यांनी शाकाहारी ढाबा टाकला. मात्र, त्याकरिता दूध, दही, ताक याची टंचाई भासत होती. त्यामुळे या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये दोन म्हशी विकत आणल्या दूध व्यवसाय सुरू केला.
दररोज ७० ते ८० लीटर दूध : गव्हाणेंजवळमुऱ्हा जातीच्या २५ म्हशी, पाच जर्शी गायी इतर १० जनावरे अशी ४० जनावरे आहेत. या जनावरांपासून मिळणारे ७० ते ८० लीटर दूध ते शहरात विक्रीसाठी आणतात.
बेरोजगारीचा प्रश्न मिटवला : दूधविक्रीकरिता गावातील १० ते १५ जणांना ठेवून गव्हाणे यांनी त्यांच्याही बेरोजगारीचा प्रश्न मिटवला आहे. या उपक्रमातून अन्य शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.
शेणखत, गोमूत्राचा वापर शेती गोबरगॅससाठी : दिलीपगव्हाणे यांनी जनावरांचे शेण गोमूत्राचा वापर गोबरगॅसकरिता केला. तसेच शेतीसाठी लागणारे शेणखतही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खडकाळ लालसर जमिनीतूनही ते आता चांगल्याप्रकारे उत्पन्न घेत आहेत. या व्यवसायात त्यांना सुनील सावळकर, सचिन आगरकर, नितीन आगरकर यांची मदत मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...