आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Force For The Separate Vidarbh, Jambuwant Dhote Say

स्वतंत्र विदर्भासाठी सुसाईड फोर्स तयार, जांबुवंत धोटे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘आम्हाला हिंसेच्या मार्गाने जायचे नाही. मात्र बळी दिल्याशिवाय स्वतंत्र विदर्भ राज्य सरकार देत नसेल, तर स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुसाईड फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आता वेगळे विदर्भ राज्य घेतल्याशिवाय राहणार नाही’, असा निर्धार विदर्भवीर, माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


सत्तेचे राजकारण होत असल्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी शेवटच्या घटकापर्यंत पोहचली नाही. नागपूर करार, अकोला करार आता कालबाह्य झाला आहे. आता आम्हाला करार नको, तर वेगळा विदर्भच पाहिजे. आता विदर्भद्रोहींचे पार्सल मुंबईला पाठवले पाहिजे, असे सांगत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 9 डिसेंबरला ‘बंद’ची हाक धोटे यांनी यावेळी दिली. यावेळी रिपाइंचे राष्‍ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, आमदार डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते.


विदर्भ जन्मसिद्ध हक्क
1957 ला वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पहिल्यांदा अकोल्यातून ब्रजलाल बियाणी यांनी रणशिंग फुंकले होते. त्यामुळे पुन्हा वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा लढा अकोल्यातून सुरु
करणार आहोत. विदर्भ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मिळवणारच, या ध्येयाने विद्यार्थ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन धोटे यांनी केले.


शिवसैनिक गप्प का?
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भाच्या आंदोलनात तोंड खुपसू नये. नक्षलवाद्यांची विदर्भासाठी मदत होत असेल, तर त्यात वावगे काय, असाही प्रश्न धोटे यांनी उपस्थित केला. विदर्भातील शिवसैनिक माझे मित्र आहेत. मात्र, वेगळ्या विदर्भाबाबत ते का बोलत नाहीत? विदर्भाची वस्तुस्थिती त्यांनी आपल्या नेत्यांना कळवावी, असा सल्लाही धोटे यांनी दिला.