आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sunandatai Cincholakar After Death The Body Donate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजासाठी प्रेरणादायी कार्य, सुनंदाताई चिंचोळकरांचे मरणोत्तर देहदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या पत्नी सुनंदाताई चिंचोळकर यांचे जून रोजी मरणोत्तर देहदान करण्यात आले. पत्नीच्या देहदानाचा निर्णय सत्यपाल महाराज त्यांचा मुलगा डाॅ. धर्मपाल यांनी घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सत्यपाल महाराज यांच्या पत्नी सुनंदा यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने जून रोजी झाले. सत्यपाल महाराजांना समर्थपणे साथ देत सुनंदाताईंनीसुद्धा अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यसनाधीनता आदींवर कठोर प्रहार केले. यशस्वी पुरुषाच्या मागे असणाऱ्या स्त्रीची भूमिका त्यांनी चांगलीच पार पडली. मरणोत्तर देहदानाची इच्छा त्यांनी आपल्या पतीजवळ व्यक्त केली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी अकोट येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपून त्यांचा देह अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयात आणला. या वेळी शरीररचना शास्त्र विभागाच्या चमूने सर्व सोपस्कार पूर्ण करून सुनंदाताईंचा देह ताब्यात घेतला.
या वेळी सत्यपाल महाराज, डॉ. धर्मपाल चिंचोळकर, गजानन चिंचोळकर, संदीपपाल महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे रामेश्वर बरगट अक्षयपाल महाराज, अनंत गावंडे, अवी गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रशांत बुले, न्यायाधीश सत्यदेव बेदरकर, मुकीम अहमद, धनंजय मिश्रा, मार्तंडराव माळी, धनंजय मिश्रा, बालाजी शिंदे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. किशोर ढोणे, गोपीअण्णा चाकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. एम. पी. फुलपाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रवीण वाघ उपस्थित होते.
- गत काही वर्षांपासून कुटुंबीयांच्या देहदानासाठी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते पुढे येत आहेत. हे समाजासाठी प्रेरणादायी कार्य ठरत आहे.''
डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
देहदानासाठी पुढे या
- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीराच्या विविध भागांचे शिक्षण घेताना देहाची गरज भासते. मात्र, वर्षाला खूप कमी प्रमाणात देहदान केले जाते. हे प्रमाण वाढायला पाहिजे. सामाजिक भावनेतून नागरिकांनी याकडे पाहावे. त्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल.''
सत्यपाल महाराज, अकोट