आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुपर पॉवर’ घोटाळा, विदर्भातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सध्या गाजत असलेल्या 80 कोटींच्या सुपर पॉवर घोटाळ्यात विदर्भातील गुंतवणूकदारांचेही सुमारे 5 कोटी रुपये अडकल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे त्यात काही सेवानिवृत्त बँक अधिकार्‍यांचा समावेश आहे. ‘सुपर पॉवर’चा संचालक दीपक पारखे याच्या प्रलोभनांना बळी पडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन सेवानिवृत्त अधिकार्‍यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. नंतर त्यांना परतावा मिळत असल्यामुळे त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी 20 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. कंपनीने 2013 पर्यंत व्यवस्थित परतावा दिला. मात्र नऊ महिन्यांपासून परतावाच कंपनीने दिला नाही.