आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर न्यायालयाच्या आवारात हाणामारी करणारे आरोपी शरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विवाहितेच्या छळप्रसंगी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या तारखेवर पोहोचलेल्या दोन्ही गटांमध्ये न्यायालयाच्या आवारात हाणामारी झाली होती. याप्रकरणी फरार असलेल्या दोन्ही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी याचिका खारीज करून दोन्ही आरोपींना न्यायालयाच्या समक्ष हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यावरून दोन्ही आरोपींनी आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मो. आझमचा विवाह निलोफरशी झाला होता. काही दिवसांनंतर विवाहितेने मो. आझमच्या कुटुंबाविरुद्ध शारीरिक मानसिक छळ होत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यावरून गुन्हा दाखल केला होता. मात्र, न्यायालयात उपस्थित राहत नसल्यामुळे न्यायालयाने मो. आझमच्याविरुद्ध वॉरंट काढले होते. त्यानंतर एका तारखेला मो. आझम त्याच्या परिवारासह न्यायालयात आला होता, तर विवाहितेचे नातेवाईकसुद्धा न्यायालयात आले होते.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. या वेळी विटांनी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेत सहभागी अब्दुल नईम अब्दुल रहेमान, अब्दुल रहिम अब्दुल रहेमान हे दोघे फरार होते.
न्यायाधीशांनी दोघांचेही जामीन अर्ज फेटाळून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दोन्ही आरोपी जुने शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी दोघांनाही न्यायाधीश एम.ए. हुसेन यांच्या न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आराेपीचे कपडे आणि रक्ताचे नमुने घेण्यासाठी त्यांना १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बातम्या आणखी आहेत...