आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांनी केली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महानयेथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडमधील वाळू १६ वर्षांपासून बदलल्याने बेडमध्ये उगवलेल्या जल वनस्पतींच्या "दिव्य मराठी'ने डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तत्परतेने दखल घेत, उपमहापौर विनोद मापारी यांनी त्याच दिवशी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
या वेळी त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून वाळू खरेदीसाठी त्वरित प्रस्ताव महासभेसमोर पाठवण्याच्या सूचना दिल्या.
उपमहापौर विनोद मापारी यांनी या गंभीर तसेच नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या वृत्ताची दखल घेत, डिसेंबरला महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राला आवश्यक असलेल्या वस्तू अथवा साहित्याबाबत माहिती दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. नागरिकांना स्वच्छ शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे यापुढे असा गंभीर प्रकार सहन केल्या जाणार नाही, अशी ताकीदही उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. नागरिकांना महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका प्रशासन नागरिकांना शुद्ध स्वच्छ पाणीपुरवठा करत असल्याचा दावा करते. मात्र, फिल्टर बेडमधील वाळू दहा वर्षांनंतर बदलणे गरजेचे असताना वाळूच बदललेली नाही. उपमहापौर विनोद मापारी यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.