आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बसदृश वस्तू अन् वाहनांची जाळपोळ; स्कॉर्पिओ गाडी,दुचाकी जाळली; पोलिसांकडून चौकशी सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव बढे - कथित स्तरावरील पूर्ववैमनस्यातून मोताळा तालुक्यातील धामणगावबढे येथे एकाच व्यक्तीच्या दोन वाहनांची जाळपोळ आणि नवीन घरासमोर गावठी बॉम्बसदृश वस्तू ठेवून धमकावण्याचा खळबळजनक प्रकार जानेवारीला पहाटे उघडकीस आला.
दरम्यान, याप्रकरणी धामणगावबढे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहा जणांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेच्या तपासात बॉम्बशोधक रोकी श्वानासही पाचारण करण्यात आले होते. पाऊस पडलेला असल्याने त्याला या घटनेच्या तपासात फारसे योगदान देता आले नाही.

अनपेक्षित धामणगावबढेसारख्या ग्रामीण भागात हा प्रकार घडल्याने परिसरात या घटनेविषयी तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे. धामणगावबढे पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या परवेज अबू बकर पटेल यांचे निवासस्थान आहे. जानेवारीला पहाटे वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला आग लावली. या गाडीलगत एक दुचाकीही उभी होती. त्यामुळे या दुचाकीनेही यामध्ये पेट घेतला. दरम्यान, उष्णतेमुळे स्कॉर्पिओचे चाक फुटून स्फोटासारखा आवाज झाल्याने परवेज अबू बकर पटेल यांना त्यांच्या कुटुंबीयांना जाग आली.
घराबाहेर येऊन पाहतात तर दोन्ही वाहनांनी पेट घेतलेला होता. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून नजीकच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर त्यांचे वडील, भाऊ वाहनचालकाने एकत्र येऊन वाहनाची आग विझवली. यामध्ये त्यांच्या वाहनाचे जवळपास आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सेवानंदन वानखेडे त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्यानंतर आग विझवण्यास सहकार्य केले.

दरम्यान, परवेज अबू बकर पटेल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एका नवीन घराचेही बांधकाम नजीकच सुरू आहे. तेथेही अज्ञात व्यक्तींनी गावठी बॉम्बसदृश वस्तू ठेवून अगरबत्तीच्या साहाय्याने त्याचा स्फोट व्हावा, अशा पद्धतीने ठेवल्याचे नंतर निदर्शनास आले. मात्र, ढगाळ वातावरण रिमझिम पावसामुळे बॉम्बसदृश वस्तूच्या वातीजवळ ठेवण्यात आलेली अगरबत्ती विझून गेल्याने पुढील अनर्थ टळला.
पाच ब्लेडने कापला सुतळ्यांचा गुंता
गावठी बॉम्बसारखी वस्तू पोलिसांसाठी काहीसी आकलनीय होती. फेव्हिकॉल, खिळे, फटाक्यातील दारूसह सुतळीच्या साहाय्याने ही वस्तू बनवण्यात आली होती. ती निकामी करताना बॉम्बशोधक नाशक पथकाने शास्त्रीय पद्धतीने ही वस्तू निकामी केली. मात्र, त्यासाठी वापरण्यात आलेले विशिष्ट प्रकारचे पाच ब्लेड वापरल्यानंतर सुतळ्यांचा हा गुंता सुटला. अर्थात पाच ब्लेड तुटल्यानंतर हा गावठी बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात यश आले.
पथकाने केली बॉम्बसदृश वस्तू निकामी केली
उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनीही लगोलग घटनास्थळ गाठून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन प्रकरणाची सूत्रे हाती घेतली बॉम्बशोधक पथकासही पाचारण करण्यात आले. रॉकी नामक श्वानाचीही त्यासाठी मदत घेण्यात आली. गावठी बॉम्बसदृश दिसणारी ती वस्तू नंतर पोलिस ठाण्याच्या मोकळ्या आवारात आणून तेथे निष्क्रिय करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सेवानंद वानखेडे हे करत आहेत.
सहा जणांची चौकशी सुरू
याप्रकरणी पोलिसांनी संशयित सहा जणांची चौकशी सुरू केली आहे. यातील चार जणांची दुपारीच चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोघांची धामणगावबढे पोलिस कसून चौकशी करत आहेत. प्रथमदर्शनी हा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असावा, असा कयास पोलिस व्यक्त करत असून, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनीही त्यास दुजोरा दिला. दरम्यान, परवेज अबू बकर पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर आग लावून एखाद्या वस्तूचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.