आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO - सुयोगचे स्टंट पाहताना रोखतात श्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चालत्या दुचाकीवर उभे राहणे, एकाच चाकावर गाडी चालविणे असे एकापेक्षा एक जबरदस्त स्टंट पाहणार्‍यांचे नक्कीच श्वास रोखले जातील, अशी स्टंटबाजी करणारा अकोल्यातील सुयोग तरोळे देशभरात नाव मिळवत आहे.

21 वर्षीय सुयोग येथील कोठारी वाटिकेत राहतो. देशभरातील स्टंट शोच्या आयोजकांकडून त्याला निमंत्रित करण्यात येते. प्रसिध्द गायक हनीसिंग यांनी चंदीगढ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठीही त्याला निमंत्रित करण्यात आले आहे. आईवडीलांपासून लपुनछपून चारवर्षापुर्वी त्याने स्टंटच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. नागपूर येथील ग्रेट जस्सल यांना त्याने गुरु केले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी स्टंट करण्याचे त्याने ठरवले. देशभरातील दहा तरुणांमध्ये स्टंट करणार्‍यांमध्ये तो एकमेव मराठी आहे.

हे स्टंट करतो
डाक्लोस्लो सर्कल स्टंट, लो व हाय टावर, एन्डोस्टोपी, कंगारुस्टॉपी, हायचेअर सर्कल, कॉम्बो व्हिलीज, ट्वेल ओ क्लॉक व्हिली, हँड रॅक सर्कल, पोडियम सर्कल, टंग स्प्रेडर, सिटटेंडर असे विविध स्टंट सुयोग करतो. हायचेअर सर्कल स्पर्धेत सन 2012 मध्ये सुयोग पहिला ठरला.
गाडीबरोबर स्वत: राहतो फिट

रोज दोन ते तीन तास स्टंटची प्रॅक्टिस. पल्सर स्वत:साठी विकसित केली. स्टंट करताना हात घासले, नाकाजवळ दुखापत आणि पायाचे हाड तुटले. अपघातापासून दूर राहण्यासाठी रोज जिममध्ये व्यायाम, मनाच्या एकाग्रतेसाठी योगासने व ध्यान धारणा करतो. गाडीचा मागील ब्रेक पायात व हातात केला, सीट उंच केली.

सावधान, इतरांनी टाळावे
स्टंट इतरांनी करू नये, स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असा सावधानतेचा इशाराही त्याने दिला.
सुयोगचे इतर स्टंट पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईडवर...

छायाचित्र - सुयोगने अचानक लावले ब्रेक