आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तायवानच्या पपईची बुलडाण्यात होतेय दररोज दोन टन विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शहरात सध्या तायवान पपईची मागणी वाढली असून, दररोज किमान दोन टन पपईची विक्री होत आहे. रमजान महिन्याला लवकरच सुरुवात होत आहे. त्या दृष्टिकोनातूनही पपईची आवक वाढत आहे.

बुलडाणा शहरात हैदराबाद येथून तायवान पपईची आवक होत आहे. या प्रकारचे पपईची शहर परिसरात मोठ्या प्रमाणात तायवान पपईची लागवड होत नाही. त्यामुळे बाहेरून पपई बोलावल्या जात आहे. मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढल्याने शुक्रवारपासून शहरात पपई दिसू लागली आहे. सकाळीच हर्राशीत पपई विकत घेतल्या जात आहे. दोन टन पपई बुलडाणा शहरवासी दररोज खात आहे. या पपईची चव गोड आहे. वजनानेही ही पपई किमान दोन किलोएवढी भरत आहे. त्यामुळे पपईची मागणी चौपट वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यातच पपई ही निसर्गताच पिकवल्या जात आहे. कागदात बांधून पपई पिकवल्या जात आहे.

शहरात होते 15 ते 20 रुपये किलोने विक्री : तायवान पपई स्वस्तात विक्री होत आहे. हर्राशीत अठरा रुपये किलोने खरेदी झालेली पपई किरकोळ विक्रेते 15 ते 20 रुपये दराने शहरात विकत आहेत. दररोज दोन हजार किलो पपईची विक्री केली आहे.
फेबुवारी आणि मार्च महिन्यात गारपीट झाल्यामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यात फळबागांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. पपईच्या क्षेत्राचेही नुकसान झाले होते. बुलडाणा परिसरातील पपईचे क्षेत्राचे नुकसान झाल्याने शेतकºयांनी नव्याने पपईची लागवड केली आहे. हैदराबाद येथून विक्रीस येणाºया पपईचेही आकर्षण परिसरातील शेतकºयांना आहे. त्यामुळे तायवान या वाणाच्या पपई लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल पहावयास मिळत आहे.
रोजा सोडण्यास उपयुक्त फळ
४ रमजान महिन्यात फळ खाण्यात येते. रोजा सोडल्यानंतर असे फळ खाताना पपईचा उपयोग केल्या जातो. कारण पावसाळ्यात कोणतेही फळ उपलब्ध होत नाही. केळी व पपई ही दोन फळे असतात. रोजा सोडल्यानंतर पपई खाणे उपयुक्त असते. ’’
शेख जावेद शेख युनूस बागवान, फळ विक्रेता, बुलडाणा.