आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात घ्या योग्य आहार; जपा आरोग्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसोड- पावसाळ्यात उपवासात आरोग्याचे हित साधण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच या कालावधीत योग्य आहाराने आपले आरोग्य नीट ठेवता येते. सध्या रमजानचे उपवासही सुरू आहेत आणि अल्पावधीत श्रावणाचे उपवास आणि व्रतवैकल्ये सुरू होतील. पावसाळा आला, की लपलेले अनेक आजार डोके वर काढतात. दूषित पाण्याच्या समस्येबरोबरच उपासतापासांचा अतिरेक हेही अनारोग्याचे एक कारण असते. पावसाळ्यात या सर्व आजारांपासून स्वतःला लांब ठेवायचे, तर आहाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी हे सल्ले थोडे महत्त्वाचे ठरतील.

जेवणात साध्या मिठाऐवजी सैंधवाचा वापर चांगला. कोरड्या चटण्यांमध्ये तीळ, जवस, शेंगदाणा, कढीपत्ता यांची चटणी घ्यावी. कोशिंबीर करताना दही घालून करण्यापेक्षा लिंबू पिळून करावी. भाज्यांमध्ये पडवळ, दोडका, घोसावळे, श्रावणघेवडा, दुधी भोपळा, वांगे अशा भाज्या खाव्यात. शक्यतो पालेभाज्या आणि कडधान्याचे प्रकार कमी खावेत. कडधान्यामुळे वात वाढतो शिवाय कडधान्ये पचायला जड असतात. त्याचेही प्रमाण कमी असावे. त्यातल्या त्यात मूग, मसूर, उडीद, कुळीथ, चवळी चालेल. बाजरी किंवा मक्याची भाकरी शक्यतो या दिवसात खाऊ नये. कारण हे दोन्ही रुक्ष आहेत वातकारक पदार्थ आहेत. मसाल्याच्या पदार्थात जिरेपूड, मिरपूड, पुदिना, लवंग, हिंग, वेलदोडा, सुंठ यांचा वापर आवर्जून असावा. दूध घ्यावे पण दुग्धजन्य पदार्थ थोडे कमीच वापरावेत. कारण त्यामुळे शरीरास त्रास होण्याचा संभव असतो.

पाणीउकळून प्यावे : सकाळीउठल्यावर एक ग्लासभर गरम पाणी प्यावे. आपल्या शरीरस्थ अग्नीला पाण्याचे सुद्धा पचन करावे लागते. पावसाळ्यात अशीही पाण्याची गरज कमी असते आणि अग्नीसुद्धा मंद असतो. अशा वेळी गरम पाण्याचा फायदा होतो. कफाचे काही आजार असल्यास तुळस, ज्येष्ठ मध, मिरे असे घालून पाणी गरम करावे. लहान मुलांना दूषित पाण्याचा जास्त धोका असतो. त्यांना शक्यतो उकळून थंड केलेले पाणी पिण्यास द्यावे. गरम केलेले पाणी थंड माठात ठेवल्यास ते उत्तम आरोग्यदायी ठरते.
हे टाळाच
- तळलेलेपदार्थतुपकट पदार्थ.
- मासे,मटणआदींनीही त्रास संभवतो.
- आंबटपदार्थखाणे टाळावे.
- दूषितपाण्यामुळेआजार.
पोटाचे विकार टाळा
प्रदूषितपाण्यामुळे पोटाचे काही आजार असतील तर बाळंतशेपा, वावडिंग घालून गरम पाणी प्यावे. गरम पाण्यामुळे वात-पित्त-कफ हे तीनही दोष वाढत तर नाहीतच उलट अन्न पचायला मदत करतात.- डॉ.धीरज देशमुख, रिसोड
बातम्या आणखी आहेत...