आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत शासनाने अन्न सुरक्षा ही अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी केले.
शहरातील अशोकनगरातील स्वस्त धान्य दुकानासमोर अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेवक शरद तुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहायक पुरवठा अधिकारी प्रदीप गणोरकर, निरीक्षण अधिकारी दिवाकर बुलबुले, विनोद वानखडे उपस्थित होते. पहिल्या दिवशी मोहन शर्मा यांच्या स्वस्त धान्य दुकानातून 10 लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात आले. 360 क्विंटल गहू व 244 क्विंटल तांदळाचे वितरण झाले. 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ या महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाला पुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांसह शहरातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. जिल्हय़ातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, मूर्तिजापूर तालुक्यांतही योजनेचा शुभारंभ तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आला. अन्नसुरक्षा योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन या वेळी मान्यवरांनी केले.