आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांबरेंना लाच मागणारा तलाठी मांजरे निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेतकरी गजानन भांबरे यांना लाचेसाठी त्रास देणारा आणि विष घेण्यास प्रवृत्त करणारा तलाठी पी. एम. मांजरे यास जुलै रोजी निलंबित करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केली.

गजानन भांबरे यांनी गावातीलच विनायक अवचार या सावकाराकडून २००१ मध्ये कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड कर्जासहित २००३ मध्ये केली. मात्र, संबंधित शेती नावावर करून घेण्याआधीच सावकाराचा मृत्यू झाला. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या
अतोनातनुकसान झाले. शासनाने सर्वेक्षण करून भांबरे यांना तीन हजार रुपये मदत जाहीर केली. गावातील इतर शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली. पण, भांबरे आवश्यक ती कागदपत्रे देण्यासाठी तलाठी मांजरे यांच्याकडे गेले असता, ते गैरअर्थसाहाय्याची मागणी करत होते. त्यामुळे त्यांना मदतीचे तीन हजार रुपये मिळाले नाहीत. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. पण, दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तलाठी मांजरे यांच्यासमोरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विष प्राशन केले होते. याप्रकरणी तहसीलदार संतोष शिंदे यांनी शेतकरी तलाठ्याचे बयाण नोंदवले. या अहवालानुसार तलाठी मांजरे यांनी त्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून थांबवायला पाहिजे होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा होता, तो दिला गेला नाही. याप्रकरणी केलेल्या चौकशीनुसार तलाठी दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.