आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tax Collection Issue At Akola Municipal Corporation

"कर' वसुलीचे आव्हान: आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापूर्वीच गाठायचेय १७ कोटीचे टार्गेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आर्थिकवर्ष संपुष्टात यायला केवळ ६८ दिवस शिल्लक राहिले आहेत. या ६८ दिवसांत १७ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेला गाठायचे आहे. दररोज किमान २० ते २५ लाख रुपये वसूल केल्यास मोठ्या प्रमाणात महसूल संकलित होऊ शकतो, तर दुसरीकडे २३ जानेवारीपासून महापालिका कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याने मालमत्ता कर वसुली प्रशासनाला आव्हान ठरणार आहे.

मालमत्ता कर वसुलीला दिवाळीनंतर खऱ्या अर्थाने गती येते, तर जानेवारीपासून नागरिकही वसुलीसाठी पुढे सरसावतात. परंतु, तरीही महापालिकेला आतापर्यंत ८० टक्के उद्दिष्ट गाठता आलेले नाही. त्यामुळेच थकित मालमत्ता कराच्या रकमेत दरवर्षी वाढ होते. वसुली थकल्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तसेच विकासकामांवर होतो. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला थकित मालमत्ता करासह एकूण ३० कोटी २५ लाख रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी महापालिकेने १९ जानेवारीपर्यंत १३ कोटी २२ लाख ८० हजार ३९९ रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. त्यामुळे अद्याप १७ कोटी रुपयांची कर वसुली महापालिकेला करावी लागणार आहे. त्यामुळेच कर वसुली वाढवण्याच्या सूचना सहायक आयुक्त माधुरी मडावी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच थकित कर वसुलीसही प्राधान्य देण्यात आले आहे. विभागाच्या दप्तरी केवळ ६४ हजार ३४२ निवासी मालमत्तांची नोंद आहे. त्यामुळेच मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. दर दिवशी २५ लाख रुपये कर केल्यास उद्दिष्ट गाठता येणार आहे. मालमत्ता कर विभागाने १७ कोटी रुपयांचा कर वसूल केला तरी, यातून केवळ तीन महिन्यांचे वेतन अदा करता येऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या एका महिन्याच्या वेतनासाठी कोटी ३० लाख रुपये खर्च करावे लागतात.
सर्वात कमी मालमत्ता उत्तर झोनमध्ये
मनपानेपूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे शहराचे वर्गीकरण केले आहे. यात सर्वात कमी निवासी मालमत्तांची संख्या उत्तर झोनमध्ये १३ हजार ४३१ आहे, तर पश्चिम झोनमध्ये सर्वात कमी व्यावसायिक मालमत्तांची संख्या ८५९ आहे.

नळधारकांची संख्या ३२ हजार
निवासीव्यावसायिक अशी मिळून एकूण मालमत्तांची संख्या ७३ हजार ८८१ आहे, तर संपूर्ण महापालिका क्षेत्रात नळधारकांची संख्या केवळ ३२ हजार आहे. यावरून महापालिका क्षेत्रात हजारो नळजोडण्या वैध करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.

हजारो मालमत्तांची नोंदणी नाही
२८चौरस किलोमीटर क्षेत्रफळात असलेल्या शहरात अद्यापही हजारो मालमत्तांची नोंद झाली नाही. त्यामुळे मनपाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलापासून वंचित राहावे लागत आहे. मालमत्ता नोंदणीचे कंत्राट दिले होते. परंतु, नोंदणी झाली नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आकडेवारी...