आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात टीबी पॉझिटिव्ह वॉर्डात सामान्य रुग्णांवर उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- क्षयरोगाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डातच सामान्य रुग्णांवरही उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात होत आहे. त्यामुळे संसर्गजन्य असलेल्या या आजाराचा सामान्य रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे; मात्र या प्रकाराकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात असलेल्या सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन गृहाच्या बाजूला क्षयरोग नियंत्रण वॉर्ड आहे. या ठिकाणी क्षयरोगाच्या सामान्य आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहे. एमडीआर रुग्णांच्या सानिध्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात संसर्ग पसरवतात. तरीसुद्धा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असा कुठलाही फरक या ठिकाणी दिसून येत नाही. या वॉर्डाअंतर्गत एकूण पाच खोल्या असून, त्यात एकूण 12 बेड उपलब्ध आहेत. बेड कमी पडत असल्याने दोन्ही बेडच्या मध्ये खालीसुद्धा काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय प्रशासनासोबत अकोला जिल्हा कोअर कमिटीला याची कल्पना असतानाही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. कोअर कमिटीने हा विषय सभेत चर्चिला नंतरही कोणताच अधिकारी या प्रo्नाला गांभिर्याने घेत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी निव्वळ खेळ सुरू आहे. अतिसूक्ष्म जंतूच्या प्रादुर्भावाने हा आजाराची लागण होते. आजारी फुफुस्साद्वारे उत्सर्गजन्य पदार्थाचा म्हणजेच कफ आदी पदार्थांच्या येण्यामधून दुसर्‍या निरोगी माणसाला प्रादरुभाव होतो. एकाच वॉर्डात दोन्ही प्रकारचे रुग्ण असल्याने रुग्णांची संख्या बळावत आहे.

सवरेपचारमधील टी.बी.वॉर्ड
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्ण अगदी हाताच्या अंतरावर आहेत. एमडीआर रुग्णाला जास्त प्रमाणात खोकला येत राहतो. खोकल्याचे जंतू उडाल्याने वार्डातील इतर रुग्णांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. संसर्गातून आजार वाढू शकतो. पॉझिटिव्ह रुग्ण थुंकल्यास त्यापासून संसर्ग होऊन इतर रुग्ण बाधित होऊ शकतात. कारण थुंकण्यासाठी रुग्णांकरिता कोणत्याही प्रकारची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. आपल्या मनाप्रमाणे रुग्ण थुंकतात. थुंकीद्वारे सामान्य रुग्णांना क्षयरोगाची लागण होऊ शकते.

दोन स्वतंत्र वार्ड निर्माण करावे
सवरेपचारमधील प्रकाराची माहिती आहे. वरिष्ठांच्या निदर्शनास बरेचदा ही बाब आणून देण्यात आली. वास्तविकत: हा प्रo्न वैद्यकीय महाविद्यालयाने निकाली काढून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे दोन स्वतंत्र वॉर्ड निर्माण करावे, जेणेकरून दोन्ही प्रकारच्या रुग्णांचा एकमेकाशी संबंध येणार नाही आणि रुग्णांची संख्या वाढणार नाही.
-डॉ. छाया देशमुख, शहर क्षयरोग अधिकारी, अकोला.

सामान्य रुग्णांच्या जीवाला धोका
एमडीआरचे रुग्णापासून सामान्य टी. बी. रुग्ण बाधित होऊन तेसुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या जीवित्वाला धोका आहे. माहाविद्यालयातील हा प्रकार गंभीरच आहे. जागेची कमतरता असल्याने कदाचित एकाच वॉर्डात दोन्ही प्रकारचे रुग्ण ठेवल्या जात असावेत. याबाबत उद्या माहिती घेऊन वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला स्वतंत्र वॉर्ड ठेवण्याबाबत आदेशित करण्याच्या सूचना देऊ.
- डॉ. शंखपाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी अकोला.