आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर : चहाच्या भावात घसरण, मनसोक्त प्या चहा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - इंग्रजांनी लावलेली चहा पिण्याची सवय आता भारतीयांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. अशातच पावसाळा म्हटलं की चहा लागतोच. वाढत्या महागाईमुळे चहा पिताना खिशाचे बजेट सांभाळावे लागते. मात्र, आता चहा प्रेमींसाठी खुशखबर असून, चहा पावडरचे भाव मोठय़ा प्रमाणात घसरले आहेत.

यंदा चहाचे दर तब्बल 50 रुपयांनी घसरले आहेत़ त्यामुळे आता स्वस्त चहाचा मस्त स्वाद चहा शौकिनांना घेता येणार आह़े यंदा चहा उत्पादन क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली़ यामुळे चहाच्या उत्पादनात वाढ झाली असून, परिणामी चहा पावडरचे दर कमी झाले आह़े एक किलो चहामागे आता 200 ते 330 इतके रुपये मोजावे लागत आह़े