आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत गेलेली शिक्षिका घरी परतलीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शाळेत जाते म्हणून सकाळीच घरून सांगून गेलेली शिक्षिका दुपारपर्यंत घरी परतली नाही. तिच्या शोधात पती, भाऊ आणि इतर नातेवाइकांनी सोमवारी पोलिस ठाणे ते रुग्णालय, अशी पायपीट केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या शिक्षिकेचा शोध लागला नव्हता.

जुने शहरातील हरिहरपेठेत शिक्षक दाम्पत्य राहते. त्यांना दोन मुले आहेत. शिक्षिकेचे वय ३५ वर्ष अाहे. डाबकी रोडवरील शाळेत ही शिक्षिका कार्यरत आहे. मुलांच्या प्रवेशासाठी इतर शिक्षिकांसोबत ही शिक्षिका सोमवारी शाळा परिसरात गेली होती. सकाळी ११ वाजता सर्व शिक्षिका शाळेत परतल्या. मात्र, ही शिक्षिका शाळेत परतली नव्हती. कुटुंबीयांनी आधी मोबाइलवर संपर्क केला. मात्र, फोन लागत नव्हता. त्यांनी नातेवाइकांकडे शोधाशोध सुरू केली. मात्र, काहीही प्रतिसाद आल्यामुळे शिक्षिकेचा पती, तिचा शिक्षक भाऊ आणि इतर नातेवाइकांनी शहरात सर्वत्र शोध घेतला. त्यांनी सर्वोपचार रुग्णालय, शहरातील सर्व पोलिस ठाणे गाठले. तेथे चौकशी केली. मात्र, त्यांना यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरूच होती.

पोलिसांची मिळाली नाही मदत
शिक्षिकेचापती भाऊ पोलिस ठाण्यात आले असता, पोलिसांनी उडतउडतच चौकशी केली. कंट्रोलरूमध्ये पोलिसांनी चौकशी करणे क्रमप्राप्त असताना पोलिसांनी सायंकाळपर्यंत तुम्हीच शोध घ्या, म्हणून नातेवाइकांना सल्ले दिले. मात्र, दिवसभर शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याने तपासकामी मदत केली नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
बातम्या आणखी आहेत...