आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका शिक्षकही उतरले आंदोलनामध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाचमहिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात १० डिसेंबरपासून सात महिन्यांचे वेतन थकलेले शिक्षकही उतरले आहेत. शिक्षकांनी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने केली तसेच टप्प्या-टप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला.
महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने पाच महिन्यांच्या थकीत वेतनासाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलनाला प्रारंभ केला. डिसेंबरला पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी ताट-वाटी वाजवून आंदोलन केले, तर १० ते १२ डिसेंबरदरम्यान दुसऱ्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे. १० डिसेंबरला महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात आता विविध शिक्षक संघटनाही उतरल्या आहेत. शाळांनी टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, समस्या मार्गी लागल्यास १९ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. टप्या-टप्प्याच्या या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व शाळा सकाळी १० ते दुपारी पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे.

१० डिसेंबरला पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीने स्वागत करून निदर्शने केली. ११ डिसेंबरला सर्व शिक्षक काळ्या फिती लावून महापालिकेसमोर निदर्शने करणार आहेत. १२ डिसेंबरला महापालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन, १५ डिसेंबरला आयुक्तांना घेराव, १६ डिसेंबरला घंटानाद, १७ १८ डिसेंबरला पथनाट्य आणि १९ डिसेंबरला साखळी उपोषण, असा आंदोलनाचा टप्पा राहणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती, शिक्षक सेना, महाराष्ट्र पुरोगामी उर्दू शिक्षक समितीचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती मगफुर अहमद, खान सरदार खान, कैलास नागे, हरिश्चंद्र इटकर, संजय शिरेकर, गोकूल हरणे, तारीक इक्बाल, इरफानुर्रहमान यांनी दिली.