आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमरॉल्डच्या विद्यार्थ्यांनी केले शिक्षकांचे पाद्यपूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वर्षभर विद्यार्थ्यांवर मेहनत घेऊन त्यांना घडणा-या शिक्षकांना गुरुदक्षिणा देणे तसे अवघड असते. मात्र, शुक्रवारी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे, शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांना अभिवादन केले. शाळेतील सभागृहात चौरंगावर बसलेल्या शिक्षिका आणि गुलाबजलाने त्यांचे पाय धुणारे विद्यार्थी हे दृश्य पाहून गुरुकुल परंपरेची आठवण झाली. प्राचीन काळी गुरूगृही राहून शिक्षा घेणारे शिष्य गुरूंचे पूजन करत असल्याचे चित्र या प्रसंगातून अनुभवायला मिळाले. शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त केशवनगर येथील एमरॉल्ड गाइट्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन केले.
शिक्षक दिनानिमित्त रोजच्या कामातून शिक्षकांना सुटी देत एक दिवस विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. यात जवळपास १५ विद्यार्थी शिक्षक, एक मुख्याध्यापक, एक शिक्षकेतर कर्मचारी दोन क्रीडा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी काम पाहिले. सुरुवातीचे तीन लेक्चर स्वयंशासित शिक्षकांनी घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शिक्षकांचे पाद्यपूजन केले. प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्ग शिक्षिकांचे पूजन केले. दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना हातांनी तयार केलेले शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संचालिका अल्पा तुलशान, मुख्याध्यापिका निर्मल शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिता इंगळे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इंगळे नयन घुले या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी गीताच्या माध्यमातून आभार मानले. त्यांनी म्हटलेल्या गीताने सर्व शिक्षिकांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाला किरण लढ्ढा, नेहा अग्रवाल, प्रियंका अग्रवाल, निस्नीम अली, अमिता रामटेके, अपर्णा यादव, गीता अहिर, प्रमिला बोरकर, प्रीती पांडे, पूजा गायकवाड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षकांसाठीखेळ : विद्यार्थ्यांनीशिक्षकांसाठी काही खेळांचे आयोजन केले होते. यात फाइंडिंग ट्रेझर या खेळाने धमाल आणली. यात सहा-सहा शिक्षकांचे चार गट तयार करून त्यांना चिठ्ठ्यांच्या साहाय्याने काही क्लू देण्यात आले.
चौरंगावर बसलेल्या शिक्षिकांचे पाय धुताना विद्यार्थी.