आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडेतीन लाख विद्यार्थ्यांशी साधला संवाद, भाषण ऐकण्यासाठी उत्साहाचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एखाद्यागोष्टीचे दान केल्यानंतर ती आपल्याकडून कमी होते. त्यात वाढ कधीच होत नाही. मात्र, विद्यादान हे एकमेव दान आहे, जे दिल्याने वाढते. आपल्याजवळील माहिती दुसऱ्यांना सांगितल्याने कमी होत नाही, तर त्यात आणखी भर पडते. विद्यादानाने आपल्या ज्ञानात वृद्धी होते, असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील येथील स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सी. डी. मायी म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त अन्य बरेच काम शिक्षकांना करावी लागतात. त्यातच त्यांचा बराच वेळ जातो. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले बदल घडावे यासाठी शिक्षक धडपडत असतात. शिक्षकांनी शिकवलेले विद्यार्थ्यांच्या अंत:करणाला भिडले तरच त्यांच्यात बदल होऊ शकतो. नाहीतर नुसते पुस्तकी ज्ञान त्यांना मिळते. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वंदन मोहोड यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. विष्णुकांत टेकाळे, डॉ. सुभाष पोटदुखे, डॉ. तामगाडगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अश्विनी जवंजाळ, अलका साई या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. डॉ. डी. एस. फड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. शेळके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एस. लहरिया यांनी केले. या वेळी डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. संजय कोकाटे, डॉ. ययाती तायडे, डॉ. एस. बी. चव्हाण, डॉ. किशोर बिडवे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.