आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher's News In Marathi, Teacher Payement Issue At Akola, Divya Marathi

मनपाचे शिक्षक वेतनापासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सफाई कामगारांच्या पाठोपाठ आता महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सप्टेंबर 2013 ते जानेवारी 2014 या पाच महिन्यांचे वेतन महापालिकेने शिक्षकांना दिले नाही. हे वेतन एकरकमी द्यावे व भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये पाच कोटी रुपये वळते न केल्यास शिक्षक संघटना न्यायालयात जाणार, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिरेकर यांनी दिला आहे.

महापालिकेच्या शिक्षकांना पाच महिन्यांपासून वेतन नाही. त्यामुळे या शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा आंदोलन करूनही महापालिका प्रशासनाने शिक्षकांना वेतन अदा केले नाही. तीन महिन्यांपूर्वी शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने दोन महिन्यांचे वेतन अदा केले होते. मात्र, पुन्हा वेतन रखडल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शिक्षक संघटनेने घेतला आहे. शिक्षकांचे पाच महिन्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामध्ये पाच कोटी रुपये वळते करणे, शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे मुख्याध्यापकपदावर पदोन्नती देणे, त्यापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना वरिष्ठ र्शेणीचे वेतन फरकाची रक्कम त्वरित मिळणेबाबत, कोणत्याही प्रकारची बढती र्शेणी देण्याआधी ज्येष्ठता यादी तपासून आक्षेप बोलवण्यात यावे आदी मागण्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिरेकर आणि जिल्हा सचिव गोकूल हरणे यांनी जिल्हाधिकारी, महापौर, शिक्षण उपसंचालक, महापालिका नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.