आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे कलेक्टर ऑफिससमोर धरणे, विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विनाअनुदानित पात्र शाळांची यादी घोषित होऊन त्यांची अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अमरावती विभागातील जवळपास दोनशे पात्र शाळांची यादी शासनाने अद्यापपर्यंत जाहीर केली नाही. याविरोधात कृती समितीने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घरासमोर मंगळवार, १२ मेपासून पुकारलेले धरणे आंदोलन जागा मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे.
विनाअनुदानित शाळा याठिकाणी अनेक वर्षांपासून विनावेतनावर कार्यरत असलेल्या शिक्षकांसमोर प्राथमिक माध्यमिक शाळांची आर्थिक तरतूद करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विभागातील विनाअनुदानित शिक्षकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने वेळोवेळी निवेदने देऊन चर्चा केली. त्यानुसार या शिक्षकांचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मुंबई येथे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एप्रिलला झालेल्या चर्चेत आठ दिवसांत पात्र शाळांची यादी लावतो, असे आश्वासन दिले होते. एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती.
विनाअनुदानित पात्र शाळांची यादी घोषित होऊन त्यांची अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. आंदोलनात विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य सचिव पुंडलिकराव रहाटे, अमरावती विभागप्रमुख एस. के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण गावंडे, दीपक मानकर, व्ही. एन. देशमुख, वैभव भेंडे, संजय क्षीरसागर, एस. टी. तायडे, ननीर, राठोड, गुजर, पारडे, हनिफ मखवानी, बी. टी. घोडमोडे, पठाण, गावंडे आदी पदाधिकाऱ्यांसह विनाअनुदानित शाळांमधील तसेच अमरावती विभागातील शिक्षकांनी या आंदाेलनात सहभाग घेतला.
पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनास मज्जाव
अमरावतीविभागातील विनाअनुदानित शिक्षकांनी कृती समितीच्या नेतृत्वात पालकमंत्री शिक्षक आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवार, १२ मेपासून धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाने पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जागेअभावी मज्जाव केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांना धरणे द्यावे लागले. जोपर्यंत पात्र शाळांची यादी जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...