आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात शिक्षिकांचा संस्था सचिवाकडून विनयभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नवोदय विद्यालयातील शिक्षकांकडून ४९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकाराला दीड महिनाही उलटत नाही, तोच शहरातील हमजा प्लॉट येथील न्यू ईकरा उर्दू प्रायमरी स्कूलच्या सचिवाने सात शिक्षिकांचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला आणखी गालबोट लागले आहे.

याप्रकरणी शिक्षिकांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी संचालकाविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. हमजा प्लॉट येथील न्यू ईकरा उर्दू स्कूलचे सचिव मो. जाकिर मो. कासब रा. तेलीपुरा याने शाळेतील सात शिक्षिकांचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षिकांनी हिंमत दाखवून आपल्याच विद्यालयाच्या सचिवाविरुद्ध दुपारी जुने शहर पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून जुने शहर पोलिस ठाण्यात कलम ३५४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत आरोपी सचिवाला अटक करण्यात आली नव्हती.
या घटनेने नवोदय विद्यालयाच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. विद्यादान करणार्‍या संस्थांमध्ये दिवसेंदिवस घडणार्‍या अशा घटनांमुळे शिक्षण क्षेत्राला गालबोट लागत आहे.

अश्लील शिवीगाळही
न्यू ईकरा उर्दू स्कूलचा सचिव मो. जाकिर मो. कासब हा शिक्षिकांना पगार देत नव्हता. पगार द्यायचा तर, तोही कापून द्यायचा. शाळेची वेळ संपल्यावरही शिक्षिकांना शाळेतच बसवून ठेवत होता. काही महिन्यांपासून तर त्याने शिक्षिकांना अश्लील शिवीगाळही करण्यास सुरुवात केली होती. येनकेनप्रकारे ताे शिक्षिकांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, असे तक्रारीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...