आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tehsildar Goes On Strike Issue At Akola, News In Marathi

आंदोलन तहसीलदारांचे; फटका बसला नागरिकांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा नायब तहसीलदार-तहसीलदार संघटनेतर्फे 24 जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. या अांदोलनाचा फटका तहसील कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना बसला.

हिंगोलीचे पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड औंढा नागनाथ येथे तहसीलदार असताना गडोळा येथील एका प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 156 (3) अन्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात 10 जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन दिलेला असतानाही हिंगोली पोलिसांनी बोधवड यांना अटक केली. ही कारवाई पोलिसांनी आकसापोटी केली. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला. या कारवाईचा अकोला जिल्हा नायब तहसीलदार- तहसीलदार संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. या प्रकाराने राज्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे तहसीलदार व नायब तहसीलदारांनी म्हटले आहे. अभिमन्यू बोधवड यांचेवरील कारवाई मागे घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय सचिव प्रा. संजय खडसे, विदर्भ संघटक समाधान सोळंके, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष राजेश वजिरे, सदस्य संतोष शिंदे, पी. यू. गिरी, सचिन पाटील, आर. एस. जाधव, जे. व्ही. वानरे, पूजा माटोडे, प्रतीक्षा तेजनकर उपस्थित होते.

या आहेत मागण्या : 1) अभिमन्यू बोधवड यांचे निलंबन मागे घ्यावे 2) सीआरपीसी कलम 156 (3) मधील तरतुदींचे अनुषंगाने शासनाने यापूर्वी अनेक बैठकीमध्ये कोणत्याही महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई होणार नाही, असे जाहीर करावे. 3) शासकीय अधिकारी यांना रीतसर उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी अटकपूर्व जामीन दिलेला असताना रात्री औरंगाबाद येथून आकसापोटी अटक करणारे पोलिस उपनिरीक्षक सय्यद यांना निलंबित करावे.
..तर 28 ला बेमुदत बंद
संघटनेच्या मागण्यांवर शासनाने विचार केला नाही, तर 28 जुलै रोजी बेमुदत बंद पुकारण्यात येईल. शासनाने सकारात्मकदृष्टया विचार करून महसुल अधिकार्‍यांना धीर द्यावा.’’ प्रा. संजय खडसे, विभागीय सचिव, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना.

साहेबांच्या प्रतीक्षेत गेला दिवस
या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. पूर्वसूचना देऊन जरी या महसूल अधिकार्‍यांनी सामूहिक रजा घेतली असली, तरी गुरुवारी दिवसभर नागरिकांना साहेब येतील अन् आपले काम करून देतील असेच वाटत राहिले. त्यामुळे बरेच नागरिक तहसील कार्यालयाच्या आवारात प्रतीक्षा करत बसलेले दिसून आले.