आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनपूर्वीच पावसाळी वातावरण; तापमानात घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अधून-मधून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, ढगाळलेल्या आभाळामुळे उन्ह सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या सरासरी तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध लागले असून, मशागत अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्याचा पारा सरासरी तीन ते चार अंशाने कमी झाल्याने नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मि‍ळाला आहे.
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असले तरीही मान्सूनपूर्व पावसाने ऐन मृगाचा मुहूर्त साधला आहे. पूर्व पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. सायंकाळी आकाशात जमा होणारे ढग पाहून शेतकरीराजा काहीसा सुखावला आहे. जिल्ह्यात या वर्षी उन्हाळ्यात मे महिन्यात सूर्याने चांगलाच ताप घेतल्याने उच्चांकी तापमान ४५ अंश इतके नोंदवले गेले होते. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तर या उष्ण वातावरणाने सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. मात्र, आता मान्सूनच्या आगमनाचे अंदाज येत असून, साधारणतः १५ जूनच्या आसपास पावसाचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे वातावरणातदेखील मान्सूनपूर्व पावसाचे संकेत मिळत आहे.
२४ तासांत हलक्या पावसाचा अंदाज
येत्या२४ तासांमध्ये जिल्ह्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसे झाल्यास तापमानामध्ये आणखी घट होणार असून, पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. परवा िजल्हयात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी काेसळल्या हाेत्या. त्यानंतर उकाड्यात वाढ झाूली हाेती.
कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढीचे संकेत
ज्यांच्याकडेबैलजोडी, अवजारांची वानवा आहे, तेथे ट्रॅक्टर इतर यांत्रिक अवजारांनी जमिनीची मशागत केली जात आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या नियोजनाला फटका देणाऱ्या पर्जन्याला सामोरे जाताना शेतकरी या वर्षी अधिक सावध झाला आहे. त्यामुळे पारंपरिक कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत असून, मका लागवड घटू शकते.
खरिपाची तयारी
जिल्ह्यातील शेतकरी वर्षभर दुष्काळ, गारपीट अवकाळीमुळे यंदा होरपळला गेला होता. मात्र, आता यंदाच्या खरीप हंगामात तरी चांगला पाऊस होईल या आशेवर खरिपाच्या तयारीला लागला आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्याला उसंत नाही. नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरणाची कामे शेतकरी करत आहे. सकाळच्या प्रहरात अधिक काम होते, तर दुपारी विश्रांतीनंतर उशिराने बैल अवजारांना जुंपले जात आहेत. काही जणांनी शेतजमिनींचे लेव्हलिंगही हाती घेतले आहे. पावसाची चाहूल लागल्याने या कामांचा वेग वाढवला जात आहे.
पाऊस
0.3 मिमी.
तापमान
किमान
२६.५
कमाल
४०.१