Home | Maharashtra | Vidarva | Akola | tension in akola after temple removed in mohta mill

मोहता मिल परिसरातील मंदिर हटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Sep 29, 2013, 12:49 PM IST

मोहता मिल मार्गावरील मंदिर हटवल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती.

  • tension in akola after temple removed in mohta mill

    अकोला- मोहता मिल मार्गावरील मंदिर हटवल्याप्रकरणी अरविंद जगताप आणि प्रशांत सांगवी या दोघांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

    जळगाव येथील बिल्डर प्रमोद रायसोनी यांनी लिलावामध्ये मोहता मिलची 16 एकर जागा विकत घेतली. या खरेदीनंतर जागेवरील बांधकाम तोडण्यास सुरुवात करण्यात आली. जागेवरील पहेलवानबाबांचे मंदिर हटवण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी 27 सप्टेंबरला रात्री घटनास्थळावर धाव घेत निषेध केला. संबंधितांवर कारवाईसाठी परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावरही धाव घेतली. आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. अशोक ओळंबे, पवन पाडीया व इतर नागरिकांनी मंदिर बांधण्याची मागणी लावून धरली. नगरसेवक सुनील मेर्शाम यांनीही नागरिकांच्या मागणीबाबत ठाणेदार विलास पाटील यांच्याशी चर्चा केली. अखेर पोलिसांनी मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले.

Trending