आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पात्रता परीक्षा दिली हजार परीक्षार्थींनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महाराष्ट्रराज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा रविवार १४ डिसेंबर रोजी शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडली. परीक्षेला हजार ३२३ परीक्षार्थी बसले असून, ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावे म्हणून मागील वर्षापासून बीएडधारकांना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली होती. जिल्ह्यातून हजार ५०१ बीएडधारकांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. ही परीक्षा भारत विद्यालय, एलआरटी महाविद्यालय, आरएलटी महाविद्यालय, आरडीजी महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले कन्या शाळा, अशा ४१ केंद्रांवर पार पडली. यांतील पहिल्या टप्प्यात २७ परीक्षा केंद्रांवर, तर दुसऱ्या टप्प्याची परीक्षा १४ केंद्रांवर पार पडली. पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील एकूण हजार ६७५ परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून, हजार ३६७ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते, तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी हजार १३४ परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यांपैकी हजार ९५६ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके जिल्हा सहनियंत्रण समितीचे पथके, असे एकूण पथके कार्यान्वित करण्यात आले होते. जिल्हा सहनियंत्रण पथकामध्ये उपजिल्हाधिकारी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त झोनल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली होती.
सर्वच केंद्रांवर परीक्षा शांततेत
-परीक्षेदरम्यानकुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये. त्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. तसेच शहरातील सर्वच केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग घेण्यात आली.शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर हजार ३२३ परीक्षार्थी बसले हाेते.'' प्रभाकरमेहरे, उपशिक्षणाधिकारीप्राथमिक

व्हिडिआे शूटिंग
शिक्षकपात्रता परिक्षेसाठी दोन टप्प्यांत झालेल्या ४१ केंद्रांवर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या सर्वच परीक्षा केंद्रांवरील प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शी पद्धतीने पार पडण्यास मदत झाली. तगड्या बंदोबस्तात शिक्षक पात्रता परीक्षा शांततेत पार पडली.