आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटांचे धागेदोरे अद्यापही पोलिस ठाण्यांच्या‘हद्दी’बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वाशिम बाहय़वळण मार्ग (बायपास) येथील गंगानगर-2 मध्ये 27 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दीपक पवारच्या घरात छापा टाकू न लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा बनवण्याचे यंत्र आणि इतर साहित्य जप्त केले. शहरात नोटा बनवण्याची सर्वात मोठी टोळी उघडकीस आल्यानंतरही या प्रक रणाचे धागेदोरे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. तपास संथगतीने सुरू असल्यामुळे मुख्य आरोपी दीपक पवार अद्यापही फरार आहे. बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांना अकोल्यात बनावट नोटा छापल्या जातात आणि त्या चलनात आणल्या जातात, अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात छापा टाकला होता. मात्र, या छाप्याची माहिती काही स्थानिक पोलिसांकडून मिळाल्याने मुख्य आरोपी दीपक पवार निसटल्याची चर्चा आहे.
बनावट नोटा छापणे आणि त्या चलनात आणणे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिसांच्या गंगानगरमध्ये केलेली कारवाई होऊन 22 दिवस उलटले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपक पवार अद्यापही फरार असून, बनावट नोटांचे धागेदोरे हाती न लागल्याने पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या नोटा महाराष्ट्राबाहेरही चलनात आणल्या जात होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या दिशेने आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकेही रवाना झाली होती. मात्र, पथकांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती आहे.
आरोपीच्या घरात सावकारीचा व्यवसाय चालत असल्याचे घरातून आढळलेल्या मुद्रांक व नोंदवहीच्या पुराव्यातून समोर आल्याने त्या दिशेने अद्यापही तपास सुरूच आहे, अशी माहिती आहे. दरम्यान दीपक पवार फरार असल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात तर जाणार नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. दरम्यान दीपक पवारचे नातेवाईक मनोज पवार आणि सूरज गोयरला पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.