अकोला - खदान पोलिस ठाण्यात एका पूर्वाश्रमीच्या सराईत आरोपीस त्याच्या वागणुकीबाबतची चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्याने या वेळी
आपणास का बोलावले म्हणून पोिलस ठाण्याच्या आवारातच गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोिलसांची तारांबळ उडाली होती. त्यांनी त्यास तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
सिंधी कॅम्प येथील निसार बेग उर्फ टेन्या अब्बास बेग याच्यावर चार पाच वर्षांपूर्वी सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. तो हाणामारी, जाळपोळ आणि दंगलीचे गंभीर गुन्ह्यात तो आरोपी होता. मात्र, त्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला हाेता. मात्र, सराईत गुन्हेगारांच्या डायरीमध्ये त्याचे नाव असल्यामुळे आणि पोिलस ठाण्यांचे वार्षिक अहवाल निरीक्षण असल्यामुळे त्याच्या पृष्ठभूमीवर पोिलसांनी त्याला ठाण्यात बोलावले होते. मात्र, या वेळी त्याने आपण आता आराेपी नसतानाही का बोलावले म्हणून पोिलसांशी वाद घातला आणि बाहेर मेडिकलमध्ये जाऊन त्याने डोकेदुखी आणि दातदुखीच्या गाेळ्या आणल्या आणि खाल्ल्या. पाेलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.