आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट, पैलपाडा व पातूर नंदापूरच्या प्रस्तावास मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे, त्या गावातील प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यावर जिल्हाधिकारी भर देत आहेत. शुक्रवारी पैलपाडा पातूर नंदापूर येथील विशेष नळयोजना दुरुस्तीच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.

पाणीटंचाई ओरड लक्षात घेता ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे निवारण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्तावावर त्वरित मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच दिवशी प्रकरण मंजूर करून तातडीने त्यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या पाणीटंचाईच्या प्रस्तावांवर तत्काळ जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी मंजुरी दिली. पैलपाडा येथे लाख २४,२१८ पातूर नंदापूर येथे ८९ हजार ८७३ रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. पैलपाडा पातूर नंदापूर येथील विशेष नळयोजना दुरुस्तीच्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.
१२८ गावांत १२४ उपाययोजना
जिल्ह्यातील१२८ गावांमध्ये १२४ प्रकारच्या विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या गावातील तलाठी, ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी तहसीलदारांमार्फत तत्काळ पाणीटंचाईचे प्रस्ताव सादर करावेत.
आमदार सावरकरांच्या प्रयत्नांना यश
अकोलापूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला तातडीने उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा पाठपुरावा केल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.