आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार, शिक्षकांच्या आंदोलनाला मिळताेय प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विनाअनुदानित पात्र शाळांची यादी घोषित होऊन त्यांची अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अमरावती विभागातील जवळपास २०० पात्र शाळांची यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. याविरोधात कृती समितीने १२ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला विविध संघटनांचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे.
विनाअनुदानित शाळा या ठिकाणी अनेक वर्षांपासून विनावेतनावर कार्यरत असलेल्या शिक्षकांसमोर या प्राथमिक माध्यमिक शाळांची आर्थिक तरतूद करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विभागातील विनाअनुदानित शिक्षकांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्यविनाअनुदानित शाळा कृती समितीने वेळोवेळी निवेदने देऊन चर्चा केली.
त्यानुसार या शिक्षकांचे पालकत्व स्वीकारण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मुंबई येथे पालकमंत्री रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत, कृती समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एप्रिलला झालेल्या चर्चेत आठ दिवसांत पात्र शाळांची यादी लावतो, असे आश्वासन दिले होते. एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. याविरोधात अमरावती विभागातील विनाअनुदानित शिक्षकांनी कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
आज आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेऊन, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर, प्राथमिकचे विस्तार अधिकारी गजानन लेखणार यांनी चर्चा केली. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र लखाडे, काँग्रेस शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे, बुद्धिस्ट अल्पसंख्याक शिक्षण संस्था संचालक मंडळाचे यू. के. रिंगणे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे सुरेशचंद्र डोंगरे, एससी-एसटी कर्मचारी अॅक्शन फोर्स संघटनेचे दीपकराज डोंगरे, समाजवादी युवाजन सभेचे सय्यद अन्सार अली यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
समस्या सुटेपर्यंत आंदोलन
जोपर्यंतपात्र शाळांची यादी जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीचे राज्य सचिव पुंडलिकराव रहाटे, अमरावती विभागप्रमुख एस. के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण गावंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...