आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारची दुचाकीला धडक, दोन जण गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट- अकोटहून अंजनगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एका कारने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, कारचालक फरार झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अकोली जहाँगिर फाट्याजवळ घडला. अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात प्रक्रिया सुरू होती.

अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथील नीतेश राऊत वय २५, सुधाकर डांगे वय ३५ आणि नितीन काळे वय २६ हे तीन जण दुचाकीने अकोटहून अंजनगावकडे जात हाेते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात कारने या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. यापैकी नीतेश आणि सुधाकर हे गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. दरम्यान, कारचालक फरार झाला असून, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली असून, अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...