आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Father Molest Girl Issue At Akola, Divya Marathi

पित्यानेच केला मुलीचा विनयभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पित्याने स्वत:च्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी खदान परिसरातील महात्मा फुलेनगरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

महात्मा फुलेनगरात राहणार्‍या दारुड्याची दारूच्या नशेत पोटच्या मुलीवर वाईट नजर गेली. त्याची पत्नी कामानिमित्त सकाळीच बाहेर गेली होती. तिने मुलीला आजीजवळ ठेवले होते. मुलगी बाहेर खेळत असताना त्याने सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मुलीला आमिष दाखवून घरात नेले. या वेळी तो दारूच्या नशेत तर्र होता. मुलीसोबत अश्लील चाळे केल्याने मुलगी रडू लागली. मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने आजी धावून गेली. आजीने मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली. तो घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी मुलीच्या आजीने खदान पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.