आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दीक्षांत समारंभ होऊ देणार नाही- राहुल नावंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-पदवी प्रमाणपत्रातून मराठी भाषा वगळल्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल नावंदे यांनी कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पदवी प्रमाणपत्र इंग्रजी भाषेत करण्यात यावे, यावर चर्चा सुरू असताना शिवसैनिकांनी धडक दिली. मराठी भाषेविषयी मराठी साहित्य संमेलने, प्रसिद्धिमाध्यमांतून मराठी भाषेचा आग्रह धरला जातो, मात्र विद्यापीठाकडूनच मराठी भाषेला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न होत असतो.
मराठी भाषेची आस्मिता जोपासण्यासाठी संत गाडगेबाबा विद्यापीठानेसुद्धा मराठी भाषेसाठी आग्रही असायला हवे, अशी आशा निवेदनातून व्यक्त केली आहे. मराठी भाषेला डावलून इतर भाषेचा वापर केल्यास दीक्षांत समारंभ उधळून लावू, असा इशारा या वेळी देण्यात आला. किशोर डिक्कर, निखिल गोदे, पंकज सुरळकर, स्वप्निल साळुंके, अमर निचत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.