आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपी सभापतीच्या पतीने केला २० लाखांचा अपहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महिला बाल कल्याण समिती सभापती गुरुवारी कक्षात नव्हत्या. )
अकोला- जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती द्रौपदाबाई वाहोकार यांचे पती परशराम वाहोकार यांच्याविरुद्ध पाणीपुरवठा योजनेत २० लाखांचा अपहार केल्याची तक्रार शाखा अभियंता इंगळे यांनी चान्नी-पातूर पोलिस स्टेशनला दिली आहे. पाणीपुरवठा योजनेत अपहार केल्याप्रकरणी पातूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी ग्रामसेवक यांना मात्र, प्रशासनाने तक्रारीतून वगळले आहे.
सभापती द्रौपदाबाई वाहोकार यांचे पती परशराम वाहोकार हे पिंपळखुटा ता. पातूर येथील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष होते. २०१२-२०१३ मध्ये पाणीपुरवठ्याची योजना राबवताना भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचा आधार घेत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने बाळापूरचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता इंगळे यांना याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी सूचित केले. यावरून इंगळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पिंपळखुटा पाणीपुरवठा योजनेचे परशराम वाहोकार हे अध्यक्ष असताना २०१२-१३ मध्ये हा अपहार झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारात सभापती पतीविरुद्ध तक्रार देण्यात आली असली, तरी यात गटविकास अधिकारी ग्रामसेवकही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येते. मात्र, पाणीपुरवठा विभाग पोलिसाकडून त्यांचा बचाव केला जात आहे. पातूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी ग्रामसेवकाचा प्रशासनाकडून बचाव केला जात असल्याचे दिसून येते.
बीडीओ वेले अडचणीत :
याप्रकाराने तत्कालीन गटविकास अधिकारी गजानन किसनराव वेले हे अडचणीत सापडले आहेत. तक्रारीत जर दोषी आढळले, तर त्यांच्यावर संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी चर्चा जिल्हा परिषदेत सुरू हाेती.
योजना राबवणारे मोकाटच
कोणतीही शासकीय योजना ही गटविकास अधिकारी गावाचा ग्रामसेवक राबवतो. जर पाणीपुरवठा योजनेच्या पैशांचा अपहार झाला असेल, तर हे दोन्ही त्यास जबाबदार आहेत. कारण प्रथम अंमलबजावणी अधिकारी म्हणून ग्रामसेवक, तर नंतर गटविकास अधिकारी असतात. त्यामुळे यांच्यावरही कारवाई अपेक्षित आहे. मात्र, पोलिसांकडून त्यांना बगल िदली जात असून, योजना राबवणारे मोकाटच असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, योजना वाऱ्यावर...वाहन गायब...
बातम्या आणखी आहेत...