आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कापड बाजारातील आगीमध्ये मोठे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-नवीन कापड बाजारातील एका होजियरी दुकानाला आग लागल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या दुकानामध्ये 12 लाख रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

न्यू क्लॉथ मार्केटमधील सिंधी कॅम्प येथे राहणारे राजेश जिवतराम बुलानी यांचे न्यू इंडिया नावाचे होजियरी वस्तूंचे दुकान आहे. या दुकानामधून सकाळी नऊ वाजता धूर येत असल्याचे सफाई कामगार जगदीश झांझोटे यांना दिसले. त्यांनी मार्केटचे मॅनेजर मुकेश भाटिया यांना सांगितले.

भाटिया यांनी बुलानी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शहर कोतवाली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळावर दाखल्या झाल्या आणि आग नियंत्रणात आली. या आगीमध्ये एकूण 12 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. त्यात व्हेल्वेट, कॅन्व्हास, टेपेस्टी, जयपुरी रजई, कर्न क्लॉपथ, बेडशिट, डनलोप फम, कारपेट, पिलोकव्हर, सोफा कव्हर, कार कव्हर, लोड कव्हर आदींसह सर्व होजियरी प्रकारच्या वस्तू जळून खाक झाल्यात.