आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडेनरा रेल्वे स्थानकात पार्सल चक्क प्लॅटफॉर्मवर, वस्तूंच्या देवाण-घेवाणासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -बडेनरा रेल्वे स्थानकात पार्सल कार्यालय चक्क प्लॅटफॉर्मवर थाटण्यात आले आहे. पूर्वी सायकल स्टँडजवळ असलेले पार्सल कार्यालय बदलणे नागरिकांसाठी असुविधाजनक ठरत आहे. कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे प्लॅटफॉर्मवर पडून असलेले साहित्य नष्ट होण्याची अधिक शक्यता आहे.

वस्तूंच्या देवाण-घेवाणासाठी : येथे तिकीट बुकिंग काउंटरच्या मागील बाजूस अनेक वर्षांपासून पार्सल कार्यालय सुरू होते. मागील काही महिन्यांपूर्वी अचानक ते प्लॅटफार्म क्रमांक 1 वर हलवण्यात आले. त्यामुळे नागरिकांना बाहेरगावी पाठवण्याचे साहित्य थेट प्लॅटफॉर्मवर नेण्याची वेळ आली आहे. शिवाय बडनेरा रेल्वे स्थानकावरील फ्लायओव्हर धोकादायक असल्याने प्लॅटफॉर्मवर साहित्य नेण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. या स्थानकास जंक्शनचा दर्जा प्राप्त असल्याने येथे मोठय़ा संख्येने प्रवाशांची गर्दी असते. शिवाय अन्य राज्यांत साहित्य पाठवण्यासाठी रेल्वेच्या पार्सल विभागाचा आधार घेतला जातो. पूर्वी असलेल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या संख्येतदेखील बदल करण्यात आला. पार्सल कार्यालयात चोवीस तास कर्मचारी कर्तव्यावर असणे गरजेचे आहे. जंक्शन मोठे असल्याने भविष्यातील येथे प्रवासी वर्दळ वाढत जाणारच. शिवाय प्रवाशांद्वारे नेण्यात येणार्‍या मालाची वाहतूकही वाढत जाणार आहे. मात्र, प्लॅटफॉर्मवरील कार्यालयात एकमेव वरिष्ठ बुकिंग लिपिक आणि मदतनीस, असे दोनच कर्मचारी कर्तव्यावर आहेत. तेदेखील सकाळी नऊ ते पाचदरम्यान पार्सल कार्यालयात कर्तव्य बजावतात. मात्र, त्यानंतर रात्री व सकाळी बुकिंग लिपिक नसल्याने साहित्य गाडीमध्ये कोण चढवणार व उतरवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.